🕒 1 min read
पंढरपूर : पंढरपूरमध्ये सध्या पोटनिवडणुकीमुळे राजकीय वातावरण तापलं आहे. या मतदारसंघावर विजय मिळवण्यासाठी अनेक दिग्गज नेत्यांनी ठाण मांडला आहे. मतदान अवघ्या काही दिवसांवर आल्याने प्रचारसभांसह राजकीय आरोप-प्रत्यारोप रंगले आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत आमदार भारत नाना भालके यांच्या आकस्मिक निधनाने रिक्त झालेल्या पंढरपुर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूकीसाठी १७ एप्रिल रोजी मतदान पार पडणार आहे. भाजप आणि राष्ट्रवादीने ही पोटनिवडणूक प्रतिष्ठेची केल्यामूळे निवडणूकीच्या रणधुमाळीची चुरस वाढली आहे. या निवडणूकीकरिता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने भारत नाना भालके यांचे चिरंजीव भगरिथ भालके यांना तर भारतीय जनता पक्षाने समाधान आवताडे यांना उमेदवारी दिली आहे.
दरम्यान, सरकार कोसळण्याबाबत विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या विधानामुळे चर्चांना उधाण आलं आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व मंत्री जयंत पाटील यांनी देखील एक सूचक विधान करून भाजपचा गोटात खळबळ उडवून दिली आहे.
काल, पंढरपुरात भगीरथ भालके यांच्या प्रचारार्थ सभेत बोलताना जयंत पाटील म्हणाले, ‘भाजपचे सरकार येईल असं खोटं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस वारंवार बोलत असतात. मात्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि देवेंद्र फडणवीस यांना त्रास नको म्हणून आम्ही गप्प आहोत. अन्यथा भाजपचा आमदार फुटला आणि आणखी एखाद्या मतदारसंघात पोटनिवडणूक लागली तर आश्चर्य वाटून घेऊ नये.’
- महाराष्ट्र ठरणार लस निर्मिती करणार पहिलं राज्य; हाफकिन संस्थेला केंद्राकडून परवानगी
- ‘खंडण्या गोळा करायला जशी यंत्रणा कामाला लावली, तशी आरोग्य यंत्रणा कामाला लावली असती तर…’
- ‘हा कुंभमेळा नाही तर करोना अॅटम बॉम्ब आहे’
- धोनीला दंड मग राजस्थान पंजाबला सुट का ; आकाश चोप्राचा सवाल
- सरकार कधी अन् कसं पडणार हे अजितदादांना माहिती आहे – चंद्रकांत पाटील


