🕒 1 min read
मुंबई : राज्यात पुन्हा एकदा कोरोना रोगाने थैमान घातला आहे. यामुळे आरोग्य सेवा देखील अपुऱ्या पडत असून हे संकट पुन्हा एकदा गडद होत असल्याचं चित्र निर्माण होत आहे. फक्त निर्बंध लागू करून कोरोना नियंत्रणात येणार नसल्याने आरोग्य सेवेमध्ये देखील मोठी वाढ करण्यात आल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सांगितले आहे. असे असूनही सध्याच्या लाटेत कोरोना प्रतिबंधक लस, रेमडेसिवीर इंजेक्शन, ऑक्सिजन पुरवठा यांचा देखील गंभीर तुटवडा निर्माण झाला आहे.
या पार्श्वभूमीवर ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून ऑक्सिजनसह रेमडेसिवीरचा आवश्यक पुरवठा उपलब्ध करून द्यावं, असं आवाहन देखील केलं आहे. या सोबतच, कोरोनाला आळा घालण्यासाठी लसीकरण महत्वाचे असल्याने महाराष्ट्राला अतिरिक्त लस पुरवठा करण्यासोबतच महाराष्ट्र शासनाच्या अखत्यारीत येणाऱ्या हाफकिन संस्थेला लस निर्मती करण्यासाठी परवानगी द्यावी याबाबत देखील त्यांनी मागणी केली होती.
आता हाफकिन संस्थेस भारत बायोटेककडून तंत्रज्ञान हस्तांतरण पद्धतीने कोवॅक्सीन बनविण्यास परवानगी मिळाली आहे. केंद्र शासनाच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाने मान्यता दिली आहे. विज्ञान व तंत्रज्ञान विभागाचे सचिव रेणू स्वरूप यांनी काल मुख्य सचिव सीताराम कुंटे यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे की, यासंदर्भात वैज्ञानिक तज्ञांच्या समितीने केलेल्या शिफारशीनुसार ही मान्यता देण्यात आली असून कोवॅक्सीन बनविण्यास १ वर्षांचा कालावधी दिला आहे.
सध्याचा वाढता संसर्ग आणि लसीकरणाची मागणी पाहता लवकरात लवकर हाफकिन बायो फार्मा कॉर्पोरेशन यांनी उत्पादन सुरू करावे तसंच हाफकिनमध्ये यादृष्टीने लसीसंदर्भात आवश्यक त्या अनुभवी व प्रशिक्षित तंत्रज्ञांची नियुक्ती व्हावी.
उद्धव ठाकरेंनी मानले पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार !
हाफकिनला भारत बायोटेककडून तंत्रज्ञान हस्तांतरण पद्धतीने कोवॅक्सिन बनवण्यास केंद्र शासनाच्या विज्ञान-तंत्रज्ञान विभागाने मान्यता दिली. आपल्या विनंतीचा स्वीकार करत केंद्राने परवानगी दिल्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी पंतप्रधान श्री.नरेंद्र मोदी यांचे आभार मानले
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) April 15, 2021
‘हाफकिनला भारत बायोटेककडून तंत्रज्ञान हस्तांतरण पद्धतीने कोवॅक्सिन बनवण्यास केंद्र शासनाच्या विज्ञान-तंत्रज्ञान विभागाने मान्यता दिली. आपल्या विनंतीचा स्वीकार करत केंद्राने परवानगी दिल्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले.’
- Breaking : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वैद्यकीय शिक्षण विभागाच्या परीक्षाही पुढे ढकलण्याचा निर्णय
- लातूर जिल्ह्यात खाजगी कोविड सेंटरमध्ये ऑक्सिजनचा तुटवडा
- ‘हा कुंभमेळा नाही तर करोना अॅटम बॉम्ब आहे’
- धोनीला दंड मग राजस्थान पंजाबला सुट का ; आकाश चोप्राचा सवाल
- सरकार कधी अन् कसं पडणार हे अजितदादांना माहिती आहे – चंद्रकांत पाटील
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

