🕒 1 min read
पंढरपूर : राज्यात पुन्हा एकदा कोरोना रोगाने थैमान घातला आहे. यामुळे आरोग्य सेवा देखील अपुऱ्या पडत असून हे संकट पुन्हा एकदा गडद होत असल्याचं चित्र निर्माण होत आहे. राज्यात आणखी कडक निर्बंध लागू करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत आमदार भारत नाना भालके यांच्या आकस्मिक निधनाने रिक्त झालेल्या पंढरपुर-मंगळवेढा मतदारसंघाची पोटनिवडणूक सुरु आहे. भारत सरकारच्या आदेशानुसार ही निवडणूक लागल्याने ती पार पडावीच लागेल अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील मतदान होईपर्यंत पंढरपुरात नियमांमध्ये सूट दिल्याची घोषणा केली होती.
आता एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. पंढरपुरात अजित पवार यांच्या एका प्रचारसभेत व्यासपीठावर हजेरी लावणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याचं कोरोनाने निधन झालं आहे. माजी जिल्हा परिषद सदस्य आणि बोराळेचे सरपंच बाबासाहेब भीमराव पाटील यांचे ७० व्या वर्षी कोरोनाने निधन झाले आहे. ९ एप्रिलला सभेपूर्वी बाबासाहेब भीमराव पाटील यांनी आरोग्य तपासणी केली होती. या सभेवेळी देखील त्यांना काहीसा त्रास जाणवत होता. सभा पार पडल्यानंतर त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे एका वृत्तवाहिनीने वृत्त दिले आहे. यानंतर त्यांच्यावर उपचार सुरु करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे.
- महाराष्ट्र ठरणार लस निर्मिती करणार पहिलं राज्य; हाफकिन संस्थेला केंद्राकडून परवानगी
- ‘खंडण्या गोळा करायला जशी यंत्रणा कामाला लावली, तशी आरोग्य यंत्रणा कामाला लावली असती तर…’
- भाजपचा आमदार फुटून पोटनिवडणूक लागली तर आश्चर्य वाटून घेऊ नये; जयंत पाटलांच सूचक विधान
- धोनीला दंड मग राजस्थान पंजाबला सुट का ; आकाश चोप्राचा सवाल
- सरकार कधी अन् कसं पडणार हे अजितदादांना माहिती आहे – चंद्रकांत पाटील
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

