Share

दिल्ली-महाराष्ट्राच्या लढाईत माझा तानाजी झालायं : प्रताप सरनाईक

Published On: 

मुंबई : ईडीने २५ नोव्हेंबर रोजी शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक आणि त्यांचे सुपुत्र विहंग आणि पूर्वेश सरनाईक यांच्या घर आणि कार्यालयावर छापे मारले होते. यानंतर ईडीने विहंग सरनाईकची चौकशी करून त्यांना सोडले होते. यानंतर त्यांना पुन्हा चौकशीसाठी हजर राहण्याचे अनेक समन्स बजावण्यात आले. मात्र, तरीही ते चौकशीला हजर राहिलेले नाहीत.

मागील सोमवारी विहंगला चौथा समन्स बजावण्यात आला होता. तर, यानंतर प्रताप सरनाईक यांना देखील ईडीने तीन समन्स बजावले होते. मात्र, चौकशीला हजर न राहता १४ दिवस आठवड्यांची मुदत सरनाईकानी ईडीकडे मागितली होती. प्रताप सरनाईक अद्यापही ईडी समोर हजर झाले नसून ते ईडीला चकवा देत आहेत, अशा चर्चांना सुरुवात झाली आहे.

आज मंगळवार निमित्त प्रताप सरनाईक हे सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठी मंदिरात आले होते. ते सहकुटुंब सिद्धिविनायकाच्या चरणी आल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत होतं. यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. ‘जगावरील कोरोनाच संकट, देशातील शेतकऱ्यांचं संकट आणि सरनाईक कुटुंबावर असलेली ईडा-पिडा टळो यासाठी देवाकडं गाऱ्हाणं बाप्पाला घातलं’ असं त्यांनी सांगितलं.

तर, ‘क्वारंटाईनमध्ये असल्याने बरेच दिवस भेट झाली नसून ईडीच्या नोटिसा देखील आल्या आहेत. त्यांना उत्तर देखील दिलं असून ईडी ही भारतातील फार मोठी संस्था आहे. देशातील भ्रष्टाचाराचे अनेक प्रकरणं त्यांनी बाहेर काढली आहेत. त्यामुळे त्या संस्थेला सहकार्य करणार’ असल्याचं ते म्हणाले.

‘ज्या-ज्या वेळी ईडीचे अधिकारी चौकशीला बोलावतील त्या वेळी चौकशीला सामोरं जाण्याची तयारी दर्शवली आहे. धाड सत्र सुरु झाल्यापासून दिल्ली आणि महाराष्ट्राच्या लढाईत माझा तानाजी झाला आहे. तो तानाजी सोळाव्या शतकातला होता. हा २१ शतकातला आहे. रयतेचं रक्षण करताना तो बिचारा धारातीर्थी पडला. मात्र, मी प्रत्येक गोष्टीला सामोरं जाण्यास सक्षम आहे.’ अशी प्रतिक्रिया देऊन त्यांनी विरोधकांच्या आरोपांना देखील प्रत्युत्तर दिलं आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!