मुंबई : ईडीने २५ नोव्हेंबर रोजी शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक आणि त्यांचे सुपुत्र विहंग आणि पूर्वेश सरनाईक यांच्या घर आणि कार्यालयावर छापे मारले होते. यानंतर ईडीने विहंग सरनाईकची चौकशी करून त्यांना सोडले होते. यानंतर त्यांना पुन्हा चौकशीसाठी हजर राहण्याचे अनेक समन्स बजावण्यात आले. मात्र, तरीही ते चौकशीला हजर राहिलेले नाहीत.
मागील सोमवारी विहंगला चौथा समन्स बजावण्यात आला होता. तर, यानंतर प्रताप सरनाईक यांना देखील ईडीने तीन समन्स बजावले होते. मात्र, चौकशीला हजर न राहता १४ दिवस आठवड्यांची मुदत सरनाईकानी ईडीकडे मागितली होती. प्रताप सरनाईक अद्यापही ईडी समोर हजर झाले नसून ते ईडीला चकवा देत आहेत, अशा चर्चांना सुरुवात झाली आहे.
आज मंगळवार निमित्त प्रताप सरनाईक हे सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठी मंदिरात आले होते. ते सहकुटुंब सिद्धिविनायकाच्या चरणी आल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत होतं. ते प्रत्येक मंगळवारी बाप्पाच्या दर्शनाला येत असतात असं देखील सांगण्यात येत होतं. तर, टॉप ग्रुपमधील आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी सरनाईक यांचे जवळचे मित्र अमित चंडोले यांना याआधीच अटक करण्यात आली आहे. त्यामुळे सरनाईकांवर काय कारवाई होणार याबाबत अनेक चर्चांना उधाण आलं आहे.
महत्वाच्या बातम्या
- पोलिसांचा वापर करुन बंद यशस्वी दाखवण्याचा सरकारचा केविलवाणा प्रयत्न सुरू : दरेकर
- शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शरद पवार, राहुल गांधींसह पाच प्रतिनिधी घेणार राष्ट्रपतींची भेट!
- एखाद्या डाकू प्रमाणे मोदी सरकारचे शेतकरीविषयक धोरण आहे : बच्चू कडू
- निवडणुकांवर डोळा ठेवून केली जाणारी राजकीय पक्षांची आंदोलने चुकीची- अण्णा हजारे
- दिलदार शेतकऱ्यांचा मोठेपणा; आंदोलनात करून दिली रुग्णवाहिकेला वाट!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

