🕒 1 min read
ऑस्ट्रेलिया : सद्या भारतीय क्रिकेट संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात भारताने २-१ ने वन-डे मालिका गमावली असून टी-२० मालिका मात्र २-१ने आपल्या खिशात घातली आहे. आजच्या तिसऱ्या टी-२० सामन्यात भारताचा १२ धावांनी पराभव झाला आहे.
ऑस्ट्रेलियाने दिलेल्या 187 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताची सुरुवात खराब झाली. डावाच्या दुसऱ्याच बॉलला सलामीवीर के. एल. राहुल शून्यावर तंबूत परतला. त्यानंतर शिखर धवन आणि कर्णधार विराट कोहलीने धावफलक हालता ठेवला. अधूनमधून शिखर-विराट आक्रमक फटके खेळत होते. मात्र असाच आक्रमक फटका खेळण्याच्या नादात शिखर धवनला कॅच आऊट व्हावं लागलं. 21 बॉलमध्ये त्याने 28 धावा केल्या. यानंतर श्रेयस अय्यर व संजू सॅमसन हे देखील लागेचचं बाद झाले.
मात्र, दुसऱ्या बाजूला विराट खिंड लढवत होता. यानंतर, हार्दिक पांड्याच्या धडाकेबाज खेळीची अपेक्षा चाहत्यांना होती. त्याने सोळाव्या आणि सतराव्या ओव्हरमध्ये तीन षटकार आणि दोन चौकार लगावत मॅच अधिक रोमांचक केली. परंतु चुकीचा फटका खेळत हार्दिक पांड्या आऊट झाला. तर, कोहली देखील ८५ धावांवर बाद झाला. अखेरीस शार्दूल ठाकूरने फटकेबाजी केली मात्र भारताचा अवघ्या १२ धावांनि पराभव झाला. यामुळे, टी-२० मालिकेत ऑस्ट्रेलियाचा व्हाईटवॉश थोडक्यात हुकला व ऑस्ट्रेलियाचा शेवट गोड झाला.
महत्वाच्या बातम्या
- पोलिसांचा वापर करुन बंद यशस्वी दाखवण्याचा सरकारचा केविलवाणा प्रयत्न सुरू : दरेकर
- शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शरद पवार, राहुल गांधींसह पाच प्रतिनिधी घेणार राष्ट्रपतींची भेट!
- एखाद्या डाकू प्रमाणे मोदी सरकारचे शेतकरीविषयक धोरण आहे : बच्चू कडू
- गेले दोन आठवडे ईडीला हुलकावणी देणारे सरनाईक सिद्धिविनायकाच्या दर्शनाला!
- दिलदार शेतकऱ्यांचा मोठेपणा; आंदोलनात करून दिली रुग्णवाहिकेला वाट!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
