ऑस्ट्रेलिया : सद्या भारतीय क्रिकेट संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात भारताने २-१ ने वन-डे मालिका गमावली असून टी-२० मालिका मात्र २-१ने आपल्या खिशात घातली आहे. आजच्या तिसऱ्या टी-२० सामन्यात भारताचा १२ धावांनी पराभव झाला आहे.
ऑस्ट्रेलियाने दिलेल्या 187 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताची सुरुवात खराब झाली. डावाच्या दुसऱ्याच बॉलला सलामीवीर के. एल. राहुल शून्यावर तंबूत परतला. त्यानंतर शिखर धवन आणि कर्णधार विराट कोहलीने धावफलक हालता ठेवला. अधूनमधून शिखर-विराट आक्रमक फटके खेळत होते. मात्र असाच आक्रमक फटका खेळण्याच्या नादात शिखर धवनला कॅच आऊट व्हावं लागलं. 21 बॉलमध्ये त्याने 28 धावा केल्या. यानंतर श्रेयस अय्यर व संजू सॅमसन हे देखील लागेचचं बाद झाले.
मात्र, दुसऱ्या बाजूला विराट खिंड लढवत होता. यानंतर, हार्दिक पांड्याच्या धडाकेबाज खेळीची अपेक्षा चाहत्यांना होती. त्याने सोळाव्या आणि सतराव्या ओव्हरमध्ये तीन षटकार आणि दोन चौकार लगावत मॅच अधिक रोमांचक केली. परंतु चुकीचा फटका खेळत हार्दिक पांड्या आऊट झाला. तर, कोहली देखील ८५ धावांवर बाद झाला. अखेरीस शार्दूल ठाकूरने फटकेबाजी केली मात्र भारताचा अवघ्या १२ धावांनी पराभव झाला. यानंतर ही मालिका जिंकल्याने चांगली कामगिरी करणाऱ्या हार्दिकला मॅन ऑफ दि सिरीज म्हणजेच मालिकावीराचा पुरस्कार देण्यात आला.
मात्र, त्यानंतर हार्दिकने असे काही कृत्य केले की, सर्व क्रिकेटचाहत्यांचा आदर त्याने कमावला. आपल्याला मिळालेली मालिकावीराची ट्रॉफी त्याने नवोदित वेगवान गोलंदाज टी नटराजनकडे सोपवत, आदर्श वस्तुपाठ घालून दिला. सद्या क्रिकेट रसिक हार्दिकच्या या कृत्यामुळे चांगलीच वाह वाह करत आहेत. हार्दिकचे हे वागणे नवोदित खेळाडूंची प्रेरणा वाढवणारे आहे.
https://www.facebook.com/OfficialHardikPandya/posts/2862555794031995
महत्वाच्या बातम्या
- दिल्ली-महाराष्ट्राच्या लढाईत माझा तानाजी झालायं : प्रताप सरनाईक
- शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शरद पवार, राहुल गांधींसह पाच प्रतिनिधी घेणार राष्ट्रपतींची भेट!
- टी-२० मालिकेत ऑस्ट्रेलियाचा व्हाईटवॉश हुकला; भारताचा पराभव
- गेले दोन आठवडे ईडीला हुलकावणी देणारे सरनाईक सिद्धिविनायकाच्या दर्शनाला!
- ‘शेतकऱ्यांप्रमाणेच शिक्षित लोकं रस्त्यावर आले असते तर ना विमानतळं विकली गेली असती, ना…’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

