Share

विश्वास नांगरे पाटील महाविकास आघाडी सरकारचे माफिया म्हणून काम करत आहेत – सोमय्या

Published On: 

मुंबई – भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या हे गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत आहेत. महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप करताना सोमय्या दिसून येत असून अनेक मंत्री सोमय्या यांच्यामुळे अडचणीत आले आहेत. विशेषतः माजी गृहमंत्री अनिल देशमुख,हसन मुश्रीफ,अनिल परब आदी नेते सोमय्या यांच्या रडारवर आहेत.

मध्यंतरी कोल्हापूरला जाताना सोमय्या यांना रोखण्यात आले होते यावरून देखील सोमय्या चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहेत. विशेष म्हणजे सोमय्या यांच्या आरोपांची मालिका सुरुच असून यावेळी कुणी राजकीय नेता नाही तर मुंबईचे पोलीस सह आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी त्यांनी लक्ष्य केलं आहे. विश्वास नांगरे पाटील महाविकास आघाडी सरकारचे माफिया म्हणून काम करत असल्याचा आरोप सोमय्या यांनी केला आहे.

घोटाळ्यांच्या प्रकरणात राज्य सरकार तपासात अडथळे निर्माण करत आहे. त्यामुळे आम्हाला केंद्राकडे जावे लागते. हसन मुश्रीफ यांच्या प्रकरणात त्यांच्यावर मुंबई पोलीसांनी केलेल्या कारवाईबाबत बोलाताना किरीट सोमय्या यांनी म्हटलं की, मुंबईचे सह पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी ठाकरे सरकारचा माफिया म्हणून काम करता येत नाही हे लक्षात घ्यावं. विश्वास नांगरे पाटलांनी मला तर बेकायदेशीर रित्या मला घरात कोंडून ठेवलं. तेच सूचना देत होते, असा आरोप किरीट सोमय्या यांनी केला.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!