Share

नवऱ्याने मारहाण करणे याला कौटुंबिक हिंसाचार म्हणतात हेच महिलांना माहित नाही-चित्रा वाघ

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : अंत्योदय प्रतिष्ठानच्या वतीने घरगुती हिंसाचार या विषयांवर मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते. या कार्यक्रमात चित्रा वाघ यांनी मार्गदर्शन केले. नवऱ्याने मारहाण करणे याला कौटुंबीक हिंसाचार म्हणतात हेच महिलांना माहित नाही असे भाजप नेत्या चित्रा वाघ यावेळी म्हणाल्या.

‘नवऱ्याने मारणे याला कौटुंबीक हिंसाचार म्हणतात असे अनेक बायकांना माहित नाही. नवऱ्याने मारणे म्हणजे संसाराच एक भाग आहे असा समज महिलांचा झाला आहे. बाईला हे माहितच नाही की कशाला कौटुंबीक हिंसाचार म्हणतात. कौटुंबिक हिंसाचाराची प्रकरणे सर्वात जास्त लॉकडाऊनच्या काळात झाली आहेत असेही वाघ म्हणाल्या.

पुढे बोलताना त्या म्हणाल्या, ऐरवी दिवसातून तीनदा जेवणारे आपण लॉकडाऊनच्या काळात पाच पाच वेळा जेवायला लागलो, याचा सर्व ताण घरातील बाईंवर पडायला लागला. मिडल क्लास असूद्या कि अप्पर मिडलक्लास किंवा उच्च वर्णीय सर्वच महिलांना यातून जावे लागत आहे. कोरोनाकाळात कमाई कमी झाली मग घर कसे चालवायचे पैसे कसे आणायचे या कारणामुळे पुरुष वर्गावर प्रचंड ताण आला.

आहे त्या पैशात घर चालवणे म्हणजे तारेवरची कसरत झाली. आणि हा ताण पुरुष मंडळीनी महिलांवर काढण्यास सुरुवात केली. आधी शिवीगाळ, अंगावर हात टाकणे अशा विविध परिस्थितीतून बाई जायाला लागली असे चित्रा वाघ म्हणाल्या. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून अमृता फडणवीस उपस्थित होत्या.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!