Share

धक्कादायक! नॅशनल बॅडमिंटनपटूचा राहत्या घराच्या छतावर संशयास्पद मृत्यू

Published On: 

नवी दिल्ली : 17 वर्षीय ज्युनियर राष्ट्रीय बॅडमिंटन चॅम्पियन श्रुती सोनीचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. मध्य प्रदेशातील बैतूल, सारणी येथील घराच्या छतावर ती मृतावस्थेत आढळली. मात्र, मृत्यूचे कारण अद्यापही स्प्ष्ट झालेले नाही. मृतदेहाचे शवविच्छेदन शुक्रवारी केले जाणार आहे. श्रुती 12 वेळा राष्ट्रीय स्तरावर खेळली होती.

श्रुतीचे वडील निकुंज सोनी हे सातपुरा औष्णिक विद्युत केंद्राच्या पॉवर हाऊस क्रमांक -4 मध्ये DE म्हणून तैनात आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, श्रुती गुरुवारी संध्याकाळी घराच्या छतावर गर्भवती मांजरीसाठी घर बांधण्यासाठी गेली होती. मात्र, अर्धा तास खाली न आल्यानंतर आईने वरच्या मजल्यावर जाऊन पाहिले, ती बेशुद्ध अवस्थेत होती. त्यानंतर श्रुतीला रुग्णालयात नेण्यात आले, रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी तिला काही वेळातच मृत घोषित केले.

सेंट्रल स्कूलची विद्यार्थिनी श्रुती या वर्षी बारावी उत्तीर्ण झाली होती. सारणी एसडीओपी महेंद्रसिंह चौहान यांनी सांगितले की, ‘मृत्यूचे कारण अद्यापही उघड झालेले नाही. श्रुतीच्या शरीरावर ना दुखापतीच्या खुणा आहेत ना संशयास्पद गोष्टी. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच काहीही याबाबत सांगता येईल.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!