पुणे : राज्यात पाऊस मोठ्या प्रमाणात झाला आहे. शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. शेतकऱ्यांना अद्याप मदत जाहीर केली नाही, वडेट्टीवार यांनी दोन दिवसात मदत जाहीर करू असं सांगितलं पण अजून मदत दिलेली नाही. ओला दुष्काळ जाहीर करण्याची विरोधी पक्षाची मागणी असल्याचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर म्हणाले. एका बाजूला शेतकरी दुःखात आहे, पण परळीमध्ये मंत्र्यांच्या स्वागताला फटाके फोडून शेतकऱ्यांची चेष्टा लावली असल्याचं वक्तव्य दरेकरांनी केलं आहे.
मुख्यमंत्री म्हणतात पंचनामे करा व सरकारमधले मंत्री म्हणतात पंचनामे न करता मदत करा. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी नेमकं काय करणार आहात हे सांगा. आमची मागणी आहे की तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करावा त्याचबरोबर पंचनामे करायचे तेव्हा करा पण आता तात्कालीक मदत शेतकऱ्यांना देण्याची आवश्यकता आहे. कारण वराती मागून घोडे नाचवून काहीच उपयोग नाही. असे दरेकरांनी ठाकरे सरकारला सुनावले आहे.
संकटाच्या काळात राजकीय भूमीका नको. जलयुक्त शिवारमुळे पाण्याची पातळी राखली गेली, योग्य नियोजन झाले. फडणवीस सरकारचा हा ड्रीम प्रोजेक्ट होता, मात्र जलयुक्त शिवार ला बदनाम करण्यासाठी मिळेल ते संधी सरकार बघत आहे. तौक्ते वादळामुळे झालेलं नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळालेली नाही, केवळ घोषणा होतात पण मदत मिळत नाही अशी टीका दरेकर यांनी केली आहे. मुख्यमंत्र्यांनी तत्काळ मदत शेतकऱ्यांच्या अकाऊंटला जमा करावी अशी विनंतीही दरेकरांनी केली आहे.
मराठवाड्यामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्यामुळे त्याभागात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मनुष्यहानी सुद्धा झाली आहे. शेतकऱ्यांचा आक्रोश, व्यथा प्रसामध्यमांच्या माध्यमातून दिसत आहेत. या पार्श्वभूमीवर मी व देवेंद्र फडणवीस येत्या दोन दिवसांचा मराठवाडा व विदर्भचा दौरा करणार असल्याचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी सांगितले आहे. ते पुण्यातील पत्रकार परिषदेत बोलत होते.
दरेकर म्हणाले की, ऐवढे दिवस उलटून सुद्धा शेतकऱ्यांना कोणत्याही पद्धतीची मदत राज्य शासनाकडून जाहीर करण्यात आली ऩाही. मंत्री धनंजय मुंडे यांनी पंचनामे न करता मदत देण्याची मागणी केली त्यावर दोन दिवसांत मदत केली जाणार असल्याचे वड्डेटीवार यांनी सांगितले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- गोव्यात शिवसेनेची सत्ता आल्यास महाराष्ट्राप्रमाणे कामगिरी करून दाखवू – संजय राऊत
- महात्मा गांधींचे विचार सामान्यांपर्यंत पोहचविण्यासाठी भाजपा तर्फे राज्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन
- भारतीय लष्कराच्या गौरवशाली आणि अभिनास्पद कामगिरीचे दर्शन घडवणारे मुंबईत उभे राहणार लष्करी संग्रहालय
- ‘माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग देश सोडून फरार?’, अजित पवारांनी दिले उत्तर
- ‘मुख्यमंत्री किती मिनिटांचा मराठवाडा दौरा करतात हे पाहावे लागेल’, मनसेचा टोला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
