पुणे: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आज शिरुर नगर परिषदेच्या नवीन प्रशासकीय इमारतीचं उद्घाटन आणि लोकार्पण सोहळा संपन्न झाला. शिरुर परिसराच्या विकास कामांसाठी येत्या मार्च अखेरपर्यंत एकूण २५ कोटी रुपयांची तरतूद करणार असून विकासकामांसाठी निधी कमी पडू देणार नाही, असे आश्वासन त्यांनी दिले आहे.
दरम्यान पुणे ते शिरुर रस्त्याच्या दुमजली कामासाठी केंद्राकडून निधी उपलब्ध करुन देण्यात आलेला आहे. वारी मार्गाचे प्रलंबित प्रश्न लवकरच मार्गी लावून विकास कामं करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.असे आवाहनही अजित पवार यांनी दिले आहे.
नागरिकांनी आपल्या जबाबदाऱ्या लक्षात घेऊनच प्रशासनाला सहकार्य करायला हवं. पुणे महानगर विकास प्राधिकरणाच्या वतीनं प्रसिद्ध करण्यात आलेल्या विकास आराखड्याबाबत नागरिकांच्या हरकती असल्यास त्यावर योग्यप्रकारे विचार करण्यात येईल.
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) October 1, 2021
तर नागरिकांनी आपल्या जबाबदाऱ्या लक्षात घेऊनच प्रशासनाला सहकार्य करायला हवं. पुणे महानगर विकास प्राधिकरणाच्या वतीनं प्रसिद्ध करण्यात आलेल्या विकास आराखड्याबाबत नागरिकांच्या हरकती असल्यास त्यावर योग्यप्रकारे विचार करण्यात येईल. अशी आशाही अजित पवार यांनी व्यक्त केली आहे. यावेळी त्यांनी कोणत्याही नागरिकांवर अन्याय होऊ न देता लोकाभिमुख,पारदर्शक कामं व्हावीत.प्रत्येक निर्णय शहराच्या विकासाला चालना देणारा असला पाहिजे.नागरिकांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी सर्वांना सोबत घेऊन शिरुर नगरीचा विकास करावा. असे आवाहनही अजित पवार यांनी केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ईडीने दाखल केलेल्या गुन्ह्याविरोधात आनंदराव अडसुळ यांची हायकोर्टात धाव
- धक्कादायक! नॅशनल बॅडमिंटनपटूचा राहत्या घराच्या छतावर संशयास्पद मृत्यू
- वराती मागून घोडे नाचवून काहीच उपयोग नाही; दरेकरांचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल
- तुम्ही दिल्लीचा गळा दाबला, शहरात येण्याची परवानगी मिळणार नाही; सर्वोच्च न्यायालयाने शेतकऱ्यांनाच फटकारलं
- नवऱ्याने मारहान करणे याला कौटुंबिक हिंसाचार म्हणतात हेच महिलांना माहित नाही; चित्रा वाघ


