Share

ईडीने दाखल केलेल्या गुन्ह्याविरोधात आनंदराव अडसुळ यांची हायकोर्टात धाव

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : शिवसेना नेते आनंदराव अडसूळ यांना न्यायालयाकडून कोणताही दिलासा देण्यात आला नाही.  अडसूळ यांच्यावर ईडीने दाखल केलेल्या गुन्ह्यांविरोधात अडसूळ यांनी आता उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली आहे. ईडीने बजावलेले समन्स आणि गुन्हा रद्द करण्यासाठी अडसूळ यांनी न्यायालयात याचिका दाखल केली आहे. याचिकेवरील सुनावणी प्रलंबित असे पर्यंत अटकेपासून अंतरिम संरक्षण देण्याचीही मागणी अडसूळ यांनी केली आहे.

आनंदराव अडसूळ यांच्यावर सिटी बँकेत 900 कोटी रुपये भ्रष्टाचार केल्याचा आरोप आहे. याचप्रकरणी 27 सप्टेंबरला त्यांना आणि त्यांचा मुलगा अभिजीत अडसूळ यांना ईडीने समन्स पाठवलं होतं. 27 तारखेला सकाळी 7 ते 7.30 वाजण्याच्या सुमारास ईडीचे अधिकारी त्यांच्या घरी दाखल झाले. त्यानंतर काही तास त्यांची चौकशी करण्यात आली. अखेर पावणे अकराच्या सुमारास ईडीने त्यांना ताब्यात घेतलं.

आनंदराव अडसूळ यांच्या वकिलाने आज उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. ईडीकडून अडसूळ यांची सुरू असलेली चौकशी आणि ECIR रद्द करण्याची मागणी या याचिकेत करण्यात आली होती. ईडीच्या वकिलांनी त्याला कडाडून विरोध केला. आम्ही ECIR दाखल केला आहे. त्यात मनी लॉन्ड्रिंग झाली आहे. त्यामुळे अडसूळ यांची चौकशी होणे गरजेचं असल्याने अडसूळ यांच्या वकिलांनी केलेली मागणी मान्य होऊ नये, अशी विनंती ईडीच्या वकिलांनी कोर्टाला केली. हायकोर्टाने दोन्ही बाजूंची मते ऐकून घेतल्यानंतर अडसूळ यांना कोणताही दिलासा देण्यास नकार दिला.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!