🕒 1 min read
युएई : दिल्ली कॅपिटल्सने सनरायजर्स हैदराबादला पराभूत करून अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे. आता दिल्ली आणि मुंबई इंडियन्समध्ये आयपीएलचे विजेतेपद मिळवण्यासाठी अंतिम सामना होणार आहे. आयपीएलच्या १३ हंगामांच्या इतिहासात पाहिले तर, दिल्लीची अंतिम सामन्यात मजल मारण्याची ही पहिलीच वेळ आहे.
यापुर्वीच्या एकाही हंगामात दिल्लीने अंतिम सामना गाठली नव्हती. तर दुसऱ्या बाजूला मुंबई संघाची अंतिम सामन्यात मजल मारण्याची ही सहावी वेळ आहे. आयपीएल विजेतेपद जिंकण्यासाठी आता हे दोन्ही संघ सज्ज झाले आहेत. उद्या म्हणजेच १० नोव्हेंबरला यंदाच्या आयपीएल सत्राच्या हंगामाचा अंतिम सामना पार पडणार आहे.
काल, रंगतदार सामन्यात दिल्लीने विजय मिळवल्यानंतर या संघाची मदार असलेल्या युवा कर्णधार श्रेयस अय्यर आणि संघावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग याने देखील एक खास मेम शेअर करत या संघाला शुभेच्छा दिल्या आहेत.
‘अंतिम फेरीत पोहोचल्याबद्दल दिल्ली कॅपिटलसचं अभिनंदन. आयपीएलचा एकमेव सक्रिय संघ ज्याने अंतिम सामना खेळला नाही तो अंतिम फेरीत प्रवेश करतो. 2020 … और बहूत कुछ दिखयेगा!’ असं ट्विट करतानाच सलमान खान याच्या चित्रपटातील एका गाण्यावरील व्हायरल झालेलं मेम देखील शेअर केलं आहे. ‘ऐसा पेहली बार हुआ है, १७-१८ सालों में’ असं या मेममध्ये लिहिलं आहे.
Congratulations #DelhiCapitals on reaching the finals. The only active IPL team to have not ever played a final makes it to the final. 2020… Aur bahut kuch dikhayega.#DCvSRH pic.twitter.com/M80Mth8B8J
— Virender Sehwag (@virendersehwag) November 8, 2020
महत्वाच्या बातम्या
- ‘कोण आला रे कोण आला आरपीआय चा वाघ आला’
- बिहारमधील एक्झिट पोलमुळे हुरळून जाऊ नका : जयंत पाटील
- खडसे माघार घ्या, अन्यथा राष्ट्रवादीला याचे परिणाम भोगावे लागतील; ब्राह्मण महासंघाचा इशारा
- ‘अमेरिकेप्रमाणे भारतालाही जो बायडन यांच्यासारख्या नेत्याची गरज आहे’
- दिवाळीत फटाके वाजवण्यासंदर्भात मुंबई महापालिकेची अजब नियमावली !
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
