सिंधुदुर्ग : बिहार विधानसभा निवडणुकीच्या तिसऱ्या आणि अंतिम टप्प्यातील मतदान पार पडल्यानंतर १० नोव्हेंबर रोजी या निवडणुकीचे निकाल समोर येणार आहेत. दरम्यान, विविध संस्थांनी केलेल्या मतदानोत्तर चाचण्यांचे (एक्झिट पोल) कल जाहीर होत आहेत.या एक्झिट पोलनुसार राष्ट्रीय जनता दल आणि काँग्रेस यांच्या महागठबंधनकडे बिहारच्या जनतेने सत्ता सोपवण्याचा निर्णय घेतल्याचे दिसून येत आहे.
बिहार विधानसभेची निवडणूक भाजपच्या नेतृत्वातील एनडीएसाठी प्रतिष्ठेची बनली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः बिहारमध्ये तब्बल १२ प्रचारसभा घेतल्या. परंतु बिहारी मतदार यावेळी मोदींच्या कोणत्याही आश्वासने आणि घोषणांना भुलले नसल्याचेच एक्झिट पोलच्या निष्कर्षांवरून स्पष्ट होत आहे.
२४३ जागांची ही विधानसभा आहे. यामधील १२२ जागा मिळाल्या तर बहुमत मिळेल आणि हे बहुमत मिळवणे तेजस्वी यादव यांच्या पक्षाला शक्य आहे अशी शक्यता आहे. जवळपास सगळ्याच एक्झिट पोलमध्ये महागठबंधनला १२० च्या वर जागा दाखवल्या आहेत.
दरम्यान, ‘बिहार विधानसभा निवडणुकीवर आलेल्या एक्झिट पोलवर लगेच विश्वास ठेवण्याची आवश्यकता नाही. गेल्यावर्षी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर आलेल्या एक्झिट पोलची आकडेवारी, त्यानंतर अंतिम निकालात आलेली आकडेवारी काय होती, ते संपूर्ण राज्याने बघितली’, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत यांनी दिली.
‘एक्झिट पोल हा अंदाज असतो. आता घोडामैदान लांब नाही. त्यामुळे ज्यांच्या बाजूने एक्झिट पोल आलाय त्यांनी हुरळून जाऊ नये. त्याचबरोबर ज्यांच्याविरोधात एक्झिट पोल आहे त्यांनादेखील वैषम्य वाटू नये. एक्झिट पोलप्रमाणे निकाल लागतात, असा मला अलीकडच्या काळात अनुभव नाही. त्यामुळे बघू काय होतं ते’, असं जयंत पाटील यांनी सांगितलं.
महत्वाच्या बातम्या
- ‘कोण आला रे कोण आला आरपीआय चा वाघ आला’
- गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचे देखील मुख्यमंत्र्यांनच्या आवाहनाला समर्थन
- खडसे माघार घ्या, अन्यथा राष्ट्रवादीला याचे परिणाम भोगावे लागतील; ब्राह्मण महासंघाचा इशारा
- न्हावरेतील घटनेचा तपास गांभीर्याने करण्याची आढळराव पाटील यांची मागणी
- दिवाळीत फटाके वाजवण्यासंदर्भात मुंबई महापालिकेची अजब नियमावली !


