भोपाळ : अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूकची सध्या जगभरात चर्चेत होत आहे. डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव करत जो बायडेन विजयी ठरलेत. लवकरच बायडेन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून पदभार स्विकारतील. दरम्यान,भारतीय-अमेरिकी वंशाच्या कमला हॅरिस या उपराष्ट्रपती म्हणून निवडून आल्या आहेत.
या निवडणुकीच्या निकालानंतर जगभरातून प्रतिक्रिया येत आहेत यातच आता काँग्रेसचे जेष्ठ नेते दिग्विजय सिंग यांनीही बायडन यांना शुभेच्छा दिल्या. सोबतच भारतालाही एका जो बायडनची गरज असल्याचं मत सिंह यांनी व्यक्त केलं आहे.
Now we need a Joe Biden in India too!! Let’s hope we get one in 2024. It should be the effort of every Indian irrespective of party affiliation. The Divisive Forces in India have to be defeated. We are Indians First!!
2/2
#IndiaFirst#UnityInDiversity— Digvijaya Singh (@digvijaya_28) November 8, 2020
आपल्या पोस्ट मध्ये ते म्हणतात, ‘अमेरिकेप्रमाणे भारतालाही जो बायडन यांच्यासारख्या नेत्याची गरज आहे. तो नेता जरी विशिष्ट पक्षाशी संबंधित असला तरीदेखील भारत आणि भारतीयत्व त्याच्यासाठी अधिक महत्वाचं असेल. देशात तेढ निर्माण करणाऱ्या प्रवृत्तींना हरवून त्याने देशातल्या सर्व घटकांना एकत्र आणण्यासाठी प्रयत्न करावा आणि 2024 मध्ये निश्चितपणे असा नेता भारताला लाभेल’, असा आशावाद दिग्विजय सिंह यांनी ट्विटरच्या माध्यमातून व्यक्त केला आहे.
Not sure about Gajni Biden who’s data crashes every 5 minutes, all the medicines they have injected in to him he won’t last more than a year, clearly Kamal Harris will run the show.
When one woman rises, she makes the way for every woman.
Cheers to this historic day ???????????? https://t.co/hpcy0YksRz— Kangana Ranaut (@KanganaTeam) November 8, 2020
दरम्यान, अभिनेत्री कंगना रनौतने देखील आपलं मत व्यक्त केलं आहे. कंगनाने केलेल्या सोशल मिडीयावरील पोस्ट मध्ये तिने बायडेन यांना गजनीची उपमा दिली आहे. ती लिहिते,गजनी बायडेन यांच्याबद्दल मी शुअर नाही..ज्यांचा डेटा प्रत्येक 5 मिनिटाला क्रॅश होतो. इतक्या औषधांचे इंजेक्शन त्यांच्यामध्ये इंजेक्ट करण्यात आले आहे, की ते 1 वर्षाहून जास्त काळ टिकू शकणार नाही. त्यामुळे हे स्पष्ट आहे की, कमला हॅरिसच शो पुढे चालवतील. जेव्हा एक महिला उठते तेव्हा ती दुसऱ्या महिलेसाठी रस्ता तयार करते. या ऐतिहासिक दिवसासाठी चिअर्स!
महत्वाच्या बातम्या
- ‘कोण आला रे कोण आला आरपीआय चा वाघ आला’
- गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचे देखील मुख्यमंत्र्यांनच्या आवाहनाला समर्थन
- खडसे माघार घ्या, अन्यथा राष्ट्रवादीला याचे परिणाम भोगावे लागतील; ब्राह्मण महासंघाचा इशारा
- न्हावरेतील घटनेचा तपास गांभीर्याने करण्याची आढळराव पाटील यांची मागणी
- दिवाळीत फटाके वाजवण्यासंदर्भात मुंबई महापालिकेची अजब नियमावली !
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

