चेन्नई : आयपीएलमध्ये रविवारी झालेल्या पहिल्या सामन्यात बेंगलूरु रॉयल्स चॅलेंजर्सने कोलकाता नाइट रायडर्स संघाचा ३८ धावांनी पराभव केला. या विजयासोबतच विराट कोहलीच्या आरसीबी संघाने विजयाची हॅटट्रिक केली. आतापर्यंतच्या झालेल्या आरसीबीच्या संघाने एकही सामना गमावला नाहीए, त्यामुळे आरसीबी हा संघ अद्याप अजिंक्य आहे.
या सामन्यात विजय मिळवत आरसीबीने विजयाची हॅटट्रिक साधली आहे. स्पर्धत आतापर्यंत अजिंक्य असणाऱ्या आरसीबीच्या नावे आणखी एका विक्रमाची नोंद झाली आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना २०४ धावांचे लक्ष्य ठेवले होते. या सामन्यात २०० धावांचा टप्पा ओलांडताच आरसीबी संघ आयपीएलच्या इतिहासात २० वेळा २०० धावांचा टप्पा गाठणारा संघ बनला आहे. आरसीबीनंतर चेन्नई सुपर किंग्सने १७ वेळा ही कामगीरी केली आहे.
या सामन्यात आरसीबीने दिलेल्या २०५ धावांचा पाठलाग करताना केकेआरचा संघ १६६ धावापर्यंत मजल मारु शकला. तसेच गुणतालीकेत अव्वल स्थान पटकावले आहे. आयपीएलच्या इतिहासात अरसीबीच्या नावे सर्वोच्च धावांचा विक्रमही आहे. २०१३च्या आयपीएल स्पर्धेत आरसीबीने पुणे वॉरीयर्स संघाविरुद्ध २६३ धावांचा विक्रम प्रस्थापित केला होता.
आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा २००पेक्षा अधिक धावा करणारे संघ
१) रॉयल चॅलेंजर्स बंगलोर – २०
२) चेन्नई सुपर किंग्ज – १७
३) पंजाब किंग्ज – १५
४) मुंबई इंडियन्स – १४
५) कोलकाता नाईट रायडर्स – १२
महत्वाच्या बातम्या
- जालना जिल्ह्यातील रस्त्यांवर शुकशुकाट; वाढते तापमान, पोलिसांच्या दंडुकेमुळे नागरिक घरात
- युजवेंद्र चहल स्पर्धेतील पहिली विकेट घेताच पत्नी धनश्रीच्या डोळ्यात पाणी
- ‘बर्थ डे बॉय’ची कमाल; वाढदिवसाच्या दिवशी अर्धशतक झळकावणारा के एल राहुल पहिलाच भारतीय
- देशात लसींचा तुटवडा नाहीच; अमित शाह यांचा दावा
- प्रसिद्ध दिग्दर्शिका सुमित्रा भावे यांचं निधन


