पुणे : प्रसिद्ध दिग्दर्शक व समाज अभ्यासक सुमित्रा भावे (वय ७८) यांचे सोमवारी सकाळी पुण्यात खासगी रुग्णालयात निधन झाले. वयाच्या ७८ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्या आयसीयूमध्ये होत्या. आज त्यांची प्राणज्योत मालावली. सुमित्रा भावे यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून आजारी होत्या. त्यांच्यावर पुण्यातल्या एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांच्या निधनामुळे सांस्कृतिक, सामाजिक विश्वातून हळहळ व्यक्त होत आहे.
सुमित्रा भावे यांनी दिग्दर्शक सुनील सुकथनकर यांच्यासह अनेक दर्जेदार मराठी चित्रपटांची निर्मिती केली. ‘बाई’, ‘पाणी’ या सुरुवातीच्या लघुपटांना लोकप्रियता मिळाल्यानंतर त्यांनी १९९५ मध्ये ‘दोघी’ हा पहिला पूर्ण लांबीचा चित्रपट तयार केला. त्यानंतर त्यांनी दिग्दर्शित केलेले ‘वास्तुपुरुष’, ‘देवराई’, ‘बाधा’, कप च्या’, असे बरेच चित्रपट गाजले. त्यांच्याअनेक चित्रपटांना राज्य व राष्ट्रीय पुरस्कारही मिळाले.
सुमित्रा भावे यांचा जन्म १२ जानेवारी १९४३ मध्ये पुण्यात झाला. फर्ग्युसन महाविद्यालयातून पदवी मिळविल्यानंतर मुंबईतील टाटा समाजविज्ञान संस्थेतून त्यांनी ग्रामीण विकास या विषयात पदविका मिळविली. शिक्षण पूर्ण झाल्यावर भावे यांनी अनेक समाजसेवी संस्थांमध्ये विनामोबदला काम केले.
- भाजपचे लोक कढईतल्या गरम वड्यासारखे उकळून फुटू लागलेत; शिवसेनेचं टीकास्त्र
- दिल्ली कॅपीट्ल्सचा पंजाब किंग्सवर ६ गडी राखुन ‘गब्बर’ विजय
- ३० एप्रिल नंतर लस न घेणाऱ्या नागरिकांना रस्त्यावर फिरू देणार नाही- आस्तिककुमार पांडे
- ‘या’ राज्यांमधून महाराष्ट्रात प्रवेश करायचा असल्यास RTPCR चाचणी बंधनकारक !
- तळीरामांना कोरोना लवकर होतो असं म्हणतात; फडणवीसांच गायकवाडांना प्रत्युत्तर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

