Share

देशात लसींचा तुटवडा नाहीच; अमित शाह यांचा दावा

Published On: 

नवी दिल्ली : कोरोनाने जगभरात थैमान घातले आहे. भारतासह महाराष्ट्रात विविध उपाययोजना करून कोरोना आटोक्यात आणण्यासाठी सत्ताधाऱ्यांची दमछाक होत आहे. दरम्यान जगभरातील संशोधक, तज्ज्ञ मंडळी कोरोनावर संशोधन करत आहेत. भारतात पुन्हा एकदा कोरोना रुग्णांच्या संख्येत प्रचंड वाढ होत असून नव्या कोरोनाबाधितांचा आकडा दररोज नवनवे विक्रम गाठताना दिसत आहे.

यामुळे अनेक राज्यांमध्ये आरोग्य सुविधांवर ताण वाढत असून ऑक्सिजन, रेमडेसिवीर इंजेक्शन यांच्यासह कोरोनाला प्रतिबंध घालण्यासाठी महत्वाचे असलेल्या लसींचा देखील तुटवडा जाणवत आहे. महाराष्ट्रात कोरोना लसीकरणाला मिळणाऱ्या प्रतिसादाच्या तुलनेत कमी लस मिळाल्यामुळे काही दिवसांपूर्वी नाईलाजाने लसीकरण बंद करावे लागले होते. आता हा पुरवठा सुरळीत झाल्याचं दिसून येत आहे.

दरम्यान, देशात लसींचा तुटवडा नसल्याचा दावा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केला आहे. ‘लसीकरणासंदर्भात वैज्ञानिकांशीही चर्चा सुरू आहे. कोरोनाशी लढण्याची पूर्ण तयारी केली जात आहे. कोरोना संक्रमण प्रसाराचा वेग प्रचंड असल्यानं लढा देणं थोडं कठीण आहे. पण, मला विश्वास आहे की, आपण त्यावर विजय मिळवू.’ असं ते म्हणाले.

यासोबतच, ‘आपल्या लसीकरण कार्यक्रमाचा वेग जगात सर्वाधिक आहे. पहिल्या दहा दिवसांत भारतात उच्चांकी लोकांचं लसीकरण केलं गेलं. पहिला डोस घेतल्यानंतर दुसऱ्या डोसमध्ये काही दिवसांचं अंतर असलं पाहिजे. त्यामुळे दुसरा डोस देण्याचा कार्यक्रमाला वेगवान केलं जाऊ शकत नाही. लसीकरणाचा तुटवडा निर्माण झाल्याच्या वृत्ताशी मी सहमत नाही,’ असं अमित शाह यांनी स्पष्ट केले.

महत्त्वाच्या बातम्या     

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!