मुंबई : इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) च्या 14 व्या मोसमातील 10 व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने (आरसीबी) कोलकाता नाईट रायडर्सचा 38 धावांनी पराभव केला. सामन्यात आरसीबीचा फिरकीपटू युजवेंद्र चहलने या मोसमातील पहिली विकेट घेतली. चहलच्या या यशानंतर त्याची पत्नी धनश्री वर्मा भावूक झाली. चेपाक स्टेडियममधील धनश्रीला तिच्या अश्रूंवर नियंत्रण ठेवता आले नाही. या हंगामात पहिली विकेट घेण्यासाठी चहलला तीन सामन्यांची प्रतीक्षा करावी लागली. शेवटच्या दोन सामन्यात त्याला एकही यश मिळालं नाही.
मुंबई इंडियन्स विरुद्ध खेळलेला सामना चहलचा आयपीएलमधील 100 वा सामना होता. त्याचवेळी केकेआरविरुद्धच्या सामन्यात चहलने 4 षटकांत 34 धावा देऊन 2 गडी बाद केले. त्याने सलामीवीर नितीश राणा आणि अनुभवी फलंदाज दिनेश कार्तिकला पॅव्हेलियनमध्ये पाठवले.
Dhanashree's reaction after chahal's first Wicket of #IPL2021 ❤️❣
Shows how much families are attached ❣❣❣❣ pic.twitter.com/CbvWbqNndX— Kohli Media (@KohlisMedia) April 18, 2021
चहल आणि धनश्रीचे गेल्या वर्षी लग्न झाले. दोघांमधले बॉन्डिंग चांगले आहे. धनश्री सोशल मीडियावर खूप अॅक्टिव आहे. आयपीएल -14 मध्ये पतीच्या समर्थनार्थ ती स्टेडियममध्ये हजर आहे. चहलने आयपीएलमध्ये 102 सामने खेळला आहे. त्याने आपल्या नावावर 123 बळी घेतले आहेत. तो आरसीबीचा मुख्य फिरकीपटू आहे.
महत्वाच्या बातम्या
- प्रसिद्ध दिग्दर्शिका सुमित्रा भावे यांचं निधन
- ब्रेक द चेन! जालना जिल्ह्यात दुपारी १ वाजेपर्यंतच किराणा, भाजीपाला विक्री
- ‘गोकुळ’मध्ये महाडिक गटाचा राष्ट्रवादीला धक्का; एकमेव संचालकाचा सत्ताधारी गटात प्रवेश
- श्रीलंकेचा दिग्गज गोलंदाज मुथय्या मुरलीधरनवर चेन्नईत करण्यात आली अँजिओप्लास्टी
- आगामी टी-२० वर्ल्डकपच्या पाश्वभूमिवर एबी डीव्हिलियर्सचे मोठे वक्तव्य


