जालना: एकीकडे कोरोनाचा कहर आणि त्यात वाढती रुग्णसंख्या या दोन समस्यांसोबत प्रशासन लढत असताना, नागरिक रस्त्यावर येत असल्याने प्रशासनच्या चिंतेत भर पडली होती. आतापर्यंत अवकाळी पाऊस, ढगाळी वातावरणामुळे वातावरणात गारवा होता, परंतू आता जिल्हा पुन्हा तापू लागला असून शहराचे तापमान चाळीशीजवळ असल्याने आणि रस्त्यावर विनाकारण फिरल्यास पोलिसांचा दंडुका पडत असल्याने लोक आता घरात बसून आहे. वीकेंडच्या रविवारी मुख्य चौकात बॅरीकेट्स लावून पोलिसांनी रस्ते बंद केल्याने अलंकार चौक, मामाचौक, बस स्थानक भागात रस्त्यांवर शुकशुकाट दिसून आला.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आज रविवारी जालना शहरात पोलिसांनी कडक निर्बंधांची अंमलबजावणी करत शहरात ठिक-ठिकाणी नाकाबंदी करत विनाकारण रस्त्यांवर फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाया केल्या. विनामास्क फिरणाऱ्या नागरीकांवर देखील दंडात्मक कारवाई करण्यात आली. पोलिसांनी आज लावलेल्या निर्बंधांची काटेकोरपणे अंमलबजावणी केल्याने शहरांतील रस्ते ओस पडल्याचं चित्र पाहायला मिळाले. मामा चौक,सावरकर चौक पोलिसांनी केलेल्या नाकाबंदीमुळे निर्मनुष्य झाले होते.
दरम्यान, कोरोनाचा वाढता उद्रेक पाहता पोलिस अधीक्षक विनायक देशमुख यांनी रविवारी मामाचौक, वीर सावरकर चौक, फुलबाजार, दानाबाजार, बस स्थानक परीसरात पाहणी करून सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्याचे आवाहन केले. यावेळी बाजारात गर्दी पाहताच पोलिसांनी आक्रमक पवित्रा घेत गर्दी हटवून विनाकारण फिरणाऱ्यांना पिटाळून लावले.
महत्वाच्या बातम्या
- प्रसिद्ध दिग्दर्शिका सुमित्रा भावे यांचं निधन
- ब्रेक द चेन! जालना जिल्ह्यात दुपारी १ वाजेपर्यंतच किराणा, भाजीपाला विक्री
- ‘गोकुळ’मध्ये महाडिक गटाचा राष्ट्रवादीला धक्का; एकमेव संचालकाचा सत्ताधारी गटात प्रवेश
- श्रीलंकेचा दिग्गज गोलंदाज मुथय्या मुरलीधरनवर चेन्नईत करण्यात आली अँजिओप्लास्टी
- आगामी टी-२० वर्ल्डकपच्या पाश्वभूमिवर एबी डीव्हिलियर्सचे मोठे वक्तव्य
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

