मुंबई : राज्य आणि देशात गेल्या काही आठवड्यापासून कोरोनाच्या संसर्गाने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. कोरोनाच्या या काळात भारतात आयपीएल स्पर्धा सुरु होती. मात्र स्पर्धेत कोरनाचा शिरकाव झाला आणि बीसीसीआयने उर्वरित स्पर्धा रद्द केली. तर, आयपीएलचे उर्वरित सामने कधी खेळवले जाणार आहेत? याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती बीसीसीआयचे वाईस प्रेसिडेन्ट राजीव शुक्ला यांनी दिली आहे.
आयपीएलची स्पर्धा रद्द झाल्याननंतर भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आपल्या घरी परतला आहे. महत्वाचे म्हणजे, घरी परतल्यानंतर विराट त्याची पत्नी अनुष्का शर्मासह समाजिक कार्यात हातभार लावत आहे. कोरोनामुळे आयपीएल रद्द झाल्यानंतर विराट कोरोना बचाव कार्यात आपले लक्ष केंद्रीत करणार आहे.
https://www.instagram.com/p/COfegizn3Lg/?utm_source=ig_web_copy_link
शिवसेनेचे युवा नेते राहुल कनाल यांनी सोशल मीडियावर विराट सोबतचा एक फोटो शेअर करत तसेच विराट कोहलीने कोरोना विरोधात समाज कार्य करण्यास सुरु केल्याची त्यांनी सांगितले आहे. अलीकडेच अनुष्का आणि विराट म्हटले होते की, कोरोना लढ्यात योगदान देण्यासाठी आम्ही पुढे आलो असून लवकरच याबाबात माहिती देऊ असे सांगितले होते.
महत्वाच्या बातम्या
- ‘प्रत्येक गोष्ट मोदींवर ढकलायची असेल तर तोंड काळे करा आणि कडी लावून निवांत घरी बसा’
- ‘पंतप्रधानांनी ३७० कलम हटवताना जी हिंमत दाखवली तीच मराठा आरक्षणाबाबत दाखवावी’
- कोरोनाचा संसर्ग वाढल्याचा परिणाम! रेल्वेकडे फिरवली प्रवाशांनी पाठ
- लसीकरणाला अडथळा! जेष्ठ लसीच्या दुसऱ्या डोसच्या प्रतीक्षेत
- परदेशी खेळाडूंचा मायदेशी परतण्याचा प्रवास सुरु !


