इंग्लंड : जागतिक कसोटी चॅम्पियनशीप स्पर्धेला आज पासून सुरुवात होत आहे. सगळीकडे या सामन्याची उत्सुकता लागली आहे. या सामन्यासाठी भारत आणि न्युझीलंड दोन्ही संघ साउथहॅमप्टटनमध्ये आहेत. डब्ल्युटीसी अंतिम सामन्यासाठी काही तसाच राहिले आहे. भारतीय संघाने या महामुकाबल्यासाठी १५ खेळाडूंची यादी जाहीर केली होती. यापैकी कोणते ११ खेळाडू रणांगणात उतरणार ? नक्की काय रणनीती असणार ? किती गोलंदाज असतील ? किती फलंदाज असतील ? किती फिरकीपटू असतील ? असे सवाल उपस्थित झाले होते.
मात्र स्पर्धेच्या एक दिवस आधी जागतिक कसोटी चॅम्पियनशीपच्या सामन्यासाठी ११ शिलेदारांची घोषणा करण्यात आली आहे. भारतीय क्रिकेट बोर्डाने या सामन्यासाठी खेळवण्यात येणाऱ्या ११ खेळाडूंची यादी जाहीर केली. भारताचा संघ जाहीर करण्यात आल्यावर कर्णधार विराट कोहलीने एक मोठा खुलासा केला आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या फायनसलाठी भारतीय संघाचा नेमका गेम प्लॅन काय असेल, याबाबत कोहलीने मोठं वक्तव्य केलं आहे.
यावेळी कोहली म्हणला, भारतीय संघ हा आक्रमकतेसाठी ओळखला जातो. त्यामुळे या सामन्यातही आम्ही आक्रमक खेळ करणार आहोत. आम्ही जेव्हा मैदानात उतरू तेव्हा आम्ही आक्रमकच असणार आहोत. आमच्यासाठी हा एक कसोटी सामना आहे, जो जिंकण्यासाठी आम्ही मैदानात उतरणार आहोत, असं विराट कोहली म्हणाला.
इंग्लंड मधील वातावरण कायम बदलत असत पण अशा वातावरणात देखील खेळण्यास आम्ही सज्ज आहोत. जर या सामन्यात पराभूत झालो अथवा जिंकलो तरीदेखील क्रिकेट थांबणार नाही. हा सामना सर्वोत्तम संघ कोणता आहे, यासाठी आहे. आतापर्यंत आम्ही गेल्या 4-5 वर्षांमध्ये सातत्यानं चांगली कामगिरी केली आहे, त्याचबरोबर बरेच विजय मिळवले आहेत. यावेळीही आम्ही विजय मिळवण्यासाठी उत्सुक आहोत, असंही विराटने सांगितलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- आंदोलन होणारच; मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतरही संभाजीराजे आंदोलनावर ठाम !
- वैजापूरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या सभापतींसह, तीन संचालकांना ‘या’ कारणामुळे नोटीसा, राजकीय वर्तुळात खळबळ!
- सुपर न्यूमररी ते युवकांवरील गुन्हे; मराठा आरक्षणाच्या बैठकीनंतर राज्य सरकारची महत्वाची भूमिका !
- आदित्य ठाकरेंच्या पुढाकाराने मुंबई, पुणे, नागपूरसह औरंगाबादचा रेस टू झिरो मोहिमेत सहभाग!
- …जेव्हा गँगस्टर नातीला खेळवतो! अरुण गवळीचा फोटो होतोय व्हायरल


