Share

…जेव्हा गँगस्टर नातीला खेळवतो! अरुण गवळीचा फोटो होतोय व्हायरल

Published On: 

मुंबई : कुख्यात गँगस्टर अरुण गवळी याच्या अनेक गुन्ह्यांच्या बातम्या समोर येत असतात. मात्र, आता अरुण गवळी उर्फ डॅडीचा एक फोटो सध्या सोशल मीडियामध्ये व्हायरल होत आहे. या फोटोत आजोबा अरुण गवळी आपल्या नातीला खेळवताना दिसत आहे. त्यामुळे अरुण गवळीचा सहसा कधी न पाहायला मिळणारा असा माया करतानाचा फोटो चांगलाच चर्चेत आहे.

अभिनेता अक्षय वाघमारे आणि योगिता गवळी यांच्या घरात गेल्या महिन्यात चिमुकलीचं आगमन झालं. गेल्या वर्षी ८ मे रोजी लग्नगाठ बांधली होती. लग्नाला वर्ष होताच दोघांनी एक आनंदाची बातमी दिली. यामुळे अक्षयच्या कुटुंबासह दगडी चाळीच्या कुटुंबात देखील आनंदाचं वातावरण आहे. योगिता आणि अक्षय यांनी लेकीचं नाव ‘अर्णा’ असं ठेवलं आहे.

https://www.instagram.com/p/CQL79Ishxi2/?utm_source=ig_web_copy_link

मागील वर्षी अक्षय आणि योगिता यांचं लग्न आणि इतर समारंभ हे दगडी चाळीत पार पडले होते. तर, २०१९ च्या डिसेंबर महिन्यात दोघांचा साखरपुडा झाला होता. दरम्यान, अक्षयने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर फोटो शेअर केला असून यात अक्षयचे आई वडील, योगिता आणि अरुण गवळीच्या मांडीवर त्यांची नात असल्याचं दिसून येत असून सर्वजण खुशीत आहेत.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!