औरंगाबाद : पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी पृथ्वी दिनाच्या दिवशी महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, औरंगाबाद शहर रेस टू झिरो मोहिमेमध्ये सहभागी होतील असे जाहीर केले होते. निव्वळ शून्य कार्बन उत्सर्जनाच्या रेस टू झिरो या आंतरराष्ट्रीय मोहिमेत औरंगाबाद महापालिकेने सहभाग घेतला आहे . महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक आस्तिक कुमार पाण्डेय यांनी या करारावर स्वाक्षरी केली असून या मोहिमेला सुरुवात करण्यात आली आहे. हि मोहीम नागरिकापर्यंत पोहोचविण्यासाठी प्रत्येक क्षेत्रात नियोजन करून टप्प्याटप्प्याने ही मोहीम यशस्वीपणे राबविण्यात येणार आहे.
डिसेंबर २०१५ मध्ये झालेल्या पॅरिस कराराचा भाग म्हणून जवळपास २०० देशांनी हरितगृह वायू उत्सर्जनावर नियंत्रण ठेवण्याचे वचन दिले आहे. जेणेकरून वैश्विक तापमानात होणारी वाढ ही २ डिग्री सेल्सिअसपर्यंत मर्यादित राहू शकेल आणि तापमानवाढ १.५ डिग्री सेल्सियसपेक्षा कमी राहील.
हे लक्ष्य साध्य करण्यासाठी जगातील बर्याच शहरांनी त्यांचे कार्बन डायऑक्साईड उत्सर्जन नेट-शून्यपर्यंत कमी करण्याचे वचन दिले आहे. यात विजेवर चालण्यासाठी सार्वजनिक आणि खाजगी वाहनांचे रूपांतर, कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी उद्योगांना पवन ऊर्जा, जलविद्युत, सौर उर्जा आणि भू-औष्णिक प्रकल्पांवर स्विच करण्यासाठी उद्योजकांना प्रोत्साहित केले जाईल.
तथापि, विशिष्ट क्षेत्रांमध्ये कार्बन उत्सर्जन थांबविले जाऊ शकत नाही उदाहरणार्थ जड वाहने विद्युत उर्जेवर चालवू शकत नाहीत. या कार्बन उत्सर्जनाची भरपाई करण्यासाठी शहरांनी सीओटु शोषण्यासाठी झाडे लावावीत जेणेकरून एकूण कार्बन डायऑक्साईड उत्सर्जन शून्य राहील. २०५० पर्यंत निव्वळ शून्य उत्सर्जन साध्य करण्यासाठी वचनबद्ध असलेल्या शहरांद्वारे जागतिक मोहीम रेस टू झिरो म्हणून ओळखली जाते.
या मोहिमेचे उद्दीष्ट या वर्षाच्या अखेरीस आयोजित करण्यात येणाऱ्या ग्लासगो येथे युनायटेड नेशन्स क्लायमेट चेंज कॉन्फरन्सच्या अगोदर डेकारबोनइज्ड अर्थव्यवस्थेकडे गती निर्माण करणे हे आहे. या मोहिमेत महानगरपालिकेचे घनकचरा व्यवस्थापन विभाग प्रमुख नंदकिशोर भोंबे यांची मोठी भूमिका राहणार आहे. स्मार्ट सिटी अंतर्गत विशेष हवामान बदल व जागतिक तापमान वाढ विभाग असून स्मार्ट सिटी विभागाच्यावतीने मोहिमेचे नियोजन केले जात आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- …जेव्हा गँगस्टर नातीला खेळवतो! अरुण गवळीचा फोटो होतोय व्हायरल
- वैजापूर सिंचन प्रकल्पाबाबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने घेतली जलसंपदा मंत्री जयंत पाटलांची खास भेट
- मराठवाड्यातील वंचित शेतकऱ्यांना पिक विम्याचा लाभ मिळावा, खासदार डॉ. भागवत कराड
- काळजी नको…शाळा सोडल्याचा दाखला नसेल तरीही प्रवेश मिळणार; शिक्षण विभागाचा महत्वाचा निर्णय
- महिला बचत गटाला मिळणार खते, बी-बियाणे विक्रीचा परवाना; लातूर जिल्ह्यातील पहिलाच उपक्रम
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

