🕒 1 min read
वैजापूर : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या सभापतींनी बाजार समितीमध्ये नियमबाह्यरीत्या स्वतःच्या मुलास शिपाई पदावर नियुक्ती केली. याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेसचे अन्य तीन संचालक ज्या मतदारसंघातून प्रतिनिधित्व करतात ते सध्या सोसायटी व ग्रामपंचायतींचे सदस्य नाहीत. त्यामुळे सभापतींसह अन्य तीन संचालकांना पदावरून अपात्र ठरविण्यात यावे. अशी तक्रार जिल्हा उपनिबंधकांकडे दाखल करण्यात आली आहे. यांना नोटीस बजावून सुनावणी ठेवली असून कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चार पदाधिकाऱ्यांवर गंडांतर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे सभापती भागिनाथ मगर यांच्यासह रिखबचंद पाटणी, राजेंद्र कराळे व मीरा मतसागर अशी या नोटीस बजावण्यात आलेल्या संचालकांची नावे आहेत. कृषी उत्पन्न बाजार समितीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे सभापती भागिनाथ मगर यांनी सभापती असतांना त्यांच्या मुलास कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शिपाई पदावर भरती केली. सभापती पदावर असताना कुटुंबातील व्यक्ती बाजार समितीमध्ये भरती करणे अथवा त्यांच्या नावाने अडत दुकाने सुरू करणे. हे बाजार समितीच्या कायद्यानुसार नियमबाह्य आहे.
या चारही पदाधिकाऱ्यांना पदावरून अपात्र ठरविण्यात यावे. अशी तक्रार वैजापूर येथील मनोज गावडे यांनी जिल्हा उपनिबंधकांकडे केली आहे. दरम्यान या पार्श्वभूमीवर जिल्हा उपनिबंधकांनी कृषी उत्पन्न बाजार समितीसह सभापती भागिनाथ मगर, राजेंद्र कराळे, रिखबचंद पाटणी व मीरा मतसागर यांना नोटीस बजावली असून याबाबत २९ जून रोजी जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्थेच्या कार्यालयात सुनावणी ठेवली आहे. या सुनावणीसाठी तक्रारदार व गैरअर्जदारांनी उपस्थित राहण्याचे आदेश जिल्हा उपनिबंधकांनी दिले आहेत.
याबाबत कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती भागिनाथ मगर म्हणाले, मुळातच या तक्रारीमध्ये फारसे काही तथ्य नाही. सेनेचे संचालक संजय निकम हेच सर्व कटकारस्थान करीत आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी ते एका बँकेचे थकबाकीदार असल्याने त्यांना बाजार समितीच्या संचालक पदावर राहता येत नाही. अशी याचिका मी औरंगाबाद उच्च न्यायालयात त्यांच्याविरुद्ध याचिका दाखल केली होती. त्या राजकीय सूड भावनेतूनच त्यांनी हे कुंभाड रचले. यातून काहीच सिध्द होणार नाही.
महत्त्वाच्या बातम्या
- …जेव्हा गँगस्टर नातीला खेळवतो! अरुण गवळीचा फोटो होतोय व्हायरल
- वैजापूर सिंचन प्रकल्पाबाबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने घेतली जलसंपदा मंत्री जयंत पाटलांची खास भेट
- मराठवाड्यातील वंचित शेतकऱ्यांना पिक विम्याचा लाभ मिळावा, खासदार डॉ. भागवत कराड
- काळजी नको…शाळा सोडल्याचा दाखला नसेल तरीही प्रवेश मिळणार; शिक्षण विभागाचा महत्वाचा निर्णय
- महिला बचत गटाला मिळणार खते, बी-बियाणे विक्रीचा परवाना; लातूर जिल्ह्यातील पहिलाच उपक्रम
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
