Share

आंदोलन होणारच; मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतरही संभाजीराजे आंदोलनावर ठाम !

Published On: 

मुंबई : खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूरमध्ये मराठा क्रांती मूक आंदोलन यशस्वीपणे संपन्न झाले. आंदोलनानंतर मराठा समन्वयक आणि आंदोलकांशी संभाजीराजे यांनी संवाद साधला. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानुसार आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री अशोक चव्हाण, मंत्री एकनाथ शिंदे, मंत्री सतेज पाटील यांच्यासह राज्यातील मराठा समाजाचे समन्वयक यांची महत्वाची बैठक पार पडली आहे.

तब्बल अडीच तास ही बैठक पार पडली. यावेळी सुरुवातीला संभाजीराजे यांनी मराठा समाजाच्या प्रमुख ६ मागण्या सविस्तरपणे मुख्यमंत्र्यांसमोर मांडल्या. या मागण्यांवर मुख्यमंत्र्यांसह उपस्थित सर्व मंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. येत्या काळात या मागण्यांसाठी पावले टाकण्यासंदर्भात सविस्तर चर्चा या बैठकीत झाली. या बैठकीनंतर खासदार संभाजीराजे यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली.

‘एकूण ३६ जिल्ह्यांमध्ये मूक आंदोलन करण्याची आमची भूमिका आहे. त्यामुळे आज राज्य सरकारने तात्काळ बैठकीचं निमंत्रण दिलं. या बैठकीत प्रमुख ६ मागण्यांवर सविस्तर चर्चा झाली. सर्वोच्च न्यायालयाने आरक्षण रद्द केल्यानंतर आता रिव्हूव्ह पेटिशन हा मार्ग समोर आहे. रिव्हूव्ह पेटिशन साठी ३३८ ब नुसार राज्यपालांच्या मार्फत राष्ट्रपती आणि राष्ट्रपतींच्या मार्फत ३४२ अ च्या माध्यमातून केंद्रीय मागास वर्ग आयोग यांच्याकडे आरक्षणाचा विषय जाऊ शकतो. येत्या गुरुवारी रिव्हूव्ह पेटिशन राज्य सरकार दाखल करणार आहे. याला समांतर मार्ग अय्यर करण्याची आम्ही सूचना केली आहे,’ अशी माहिती संभाजीराजे यांनी दिली आहे.

पुढे संभाजीराजे यांनी सारथीच्या निधीसह त्याचे योग्य नियोजन, मराठा विद्यार्थ्यांसाठी २३ जिल्ह्यांमध्ये वसतिगृह, अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या मार्फत योग्य कर्ज वितरण, सुपर न्यूमररीचा मार्गातून नियुक्त्या, कोपर्डी घटनेच्या आरोपींना शिक्षा मिळण्याकरिता योग्य कायदेशीर पावले उचलणे, मराठा समाजातील व्यक्तीवर मराठा आरक्षणाच्या आंदोलनादरम्यान दाखल करण्यात आलेले गुन्हे अशा अनेक मुद्द्यांबाबत सविस्तर माहिती दिली.

यानंतर, जाहीर केलेलं मूक आंदोलन हे होणारच आहे, आंदोलन मागे घेणार नाही. राज्य सरकारशी चर्चा सुरु आहे. येत्या २१ तारखेला नाशिकमध्ये  राज्यभरातील समन्वयक जमतील त्यांच्याशी चर्चा करून पुढची दिशा ठरवू. त्यामुळे मूक आंदोलन अद्याप स्थगित केलं नसून सर्व समन्वयकांशी चर्चा केल्यानंतर ठरवलं जाईल , अशी भूमिका संभाजीराजे यांनी स्पष्ट केली आहे.

महत्वाच्या बातम्या

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!