🕒 1 min read
नवी दिल्ली : न्यूझीलंडला टी-20 आणि कसोटी मालिकेत पराभूत केल्यानंतर टीम इंडियाने दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जाण्याची तयारी सुरू केली आहे. दक्षिण आफ्रिका दौऱ्यापूर्वी सलामीवीर रोहित शर्माची बुधवारी भारताच्या वनडे कर्णधारपदी निवड करण्यात आली. बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी गुरुवारी सांगितले की, ‘बोर्ड आणि निवडकर्त्यांनी मिळून रोहित शर्माला संघाचा पूर्णवेळ कर्णधार म्हणून नियुक्त केले आहे.
गांगुली म्हणाला की, ‘मी आणि निवडकर्त्यांनी कोहलीशी यापूर्वीही बोलले होते. त्याचबरोबर, बीसीसीआयने भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीचे वनडेमध्ये कर्णधार म्हणून दिलेल्या योगदानाबद्दल आभार मानले.
गांगुली पुढे म्हणाला, ‘हा निर्णय बीसीसीआय आणि निवडकर्त्यांनी मिळून घेतला होता. वास्तविक, बीसीसीआयने विराटला टी-२० कर्णधारपद सोडू नये, अशी विनंती केली होती, पण तो मान्य झाला नाही. मग निवडकर्त्यांनी ठरवले की वेगवेगळ्या फॉरमॅटसाठी वेगवेगळे कर्णधार असू शकत नाहीत. त्यामुळेच विराट कसोटी कर्णधारपदी राहणार आणि रोहित वनडे आणि टी-20ची कमान सांभाळणार हे निश्चित झाले. बीसीसीआय अध्यक्ष या नात्याने मी वैयक्तिकरित्या विराट कोहलीशी बोललो आहे आणि निवड समितीचे अध्यक्षही त्यांच्याशी बोलले आहेत.
गांगुली पुढे म्हणाला, ‘आम्हाला रोहित शर्माच्या कर्णधारपदावर पूर्ण विश्वास आहे. विराट कसोटी संघाचे कर्णधारपद सांभाळणार आहे. टीम इंडिया चांगल्या हातात असल्याचा बीसीसीआयला विश्वास आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये कर्णधार म्हणून दिलेल्या योगदानाबद्दल आम्ही विराट कोहलीचे आभार मानतो.’
A leader who led the side with grit, passion & determination. ????????????
Thank you Captain @imVkohli!????????#TeamIndia pic.twitter.com/gz7r6KCuWF
— BCCI (@BCCI) December 9, 2021
रोहितची भारताच्या कसोटी उपकर्णधारपदीही निवड करण्यात आली आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या आगामी तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी निवडकर्त्यांनी 18 सदस्यीय संघाची निवड केली आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 3 कसोटी मालिका आणि 3 एकदिवसीय सामने खेळवले जातील. ही मालिका २६ डिसेंबरपासून सुरू होणार आहे.
महत्वाच्या बातम्या:
- तुमचे खासदार सुद्धा आमच्या जीवावरच निवडून आलेत; शंभुराज देसाईंचा चंद्रकांत पाटलांना टोला
- जंगलपहाडातला योद्धा शेवटी जंगलातच कोसळला- संजय राऊत
- तुमचे कू कृत्य जनतेसमोर उघडे करू – आशिष शेलार
- अंकिता लोखंडेच्या लग्नास विलंब? ; लग्नापूर्वी दिली दु:खद बातमी
- ‘महाराष्ट्रातील ओबीसींवरच असा अन्याय का?’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
