पुणे : इंग्लंड विरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय रविवरी भारत विरुद्ध इंग्लंड संघातील वनडे मालिकेतील तिसरा सामना झाला. या सामन्यात भारताने ७ धावांनी विजय मिळवत मालिका २-१ अशा फरकाने जिंकली आहे. निर्णायक एकदिवसीय सामन्यात भारताने इंग्लंडवर 7 धावांनी विजय मिळवला. शेवटच्या षटकांत इंग्लंडला विजयासाठी 6 चेंडूत 14 धावांची आवश्यकता होती, मात्र नटराजनने अचूक गोलंदाजी करताना केवळ 6 धावा दिल्या आणि भारताने विजय साकार केला. या विजयासह भारताने 3 सामन्यांची मालिका 2-1 ने जिंकली. सॅम करनला सामनावीर, तर जॉनी बेअरस्टोला मालिकावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.
दरम्यान, या सामन्यात भारतीय संघाला मिळालेल्या विजयाचे श्रेय कर्णधार विराट कोहली याने गोलंदाजांना दिले आहे. तसेच या सामन्यात चांगली कामगिरी करणारा शार्दुल ठाकूर आणि संपूर्ण मालिकेमध्ये भेदक गोलंदाजी करणाऱ्या भुवनेश्वर कुमार याला मालिकावीर पुरस्कार न मिळाल्याने आश्चर्य व्यक्त केले.
सामन्यानंतर विराट कोहली म्हणाला की, जेव्हा दोन आघाडीचे संघ एकमेकांविरोधात खेळतात तेव्हा ते सामना अटीतटीचे होतात. सॅम करणने खूप चांगली खेळी केली. मात्र आमच्या गोलंदाजांनी सातत्याने बळी टिपले. तसेच शेवटच्या षटकांमध्ये हार्दिक पांड्या आणि नटराजन यांनी चांगली गोलंदाजी केली. आम्ही काही झेल सोडले, ही बाब निराशाजनक होती. मात्र असे असले तरी अखेरीस आम्ही विजय मिळवण्यात यशस्वी ठरलो. मात्र शार्दुल ठाकूरला सामनावीर आणि भुवनेश्वर कुमारला मालिकावीर पुरस्कार मिळाला नाही, याचे मला आश्चर्य वाटले. सर्वात जास्त श्रेय हे गोलंदाजांनाच आहे कारण त्यांनी अत्यंत विपरित परिस्थितीमध्ये चांगली गोलंदाजी केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- राजकारणात कोण कोणाचा शत्रू नसतो; शाह-पवारांच्या भेटीबाबत आव्हाडांची प्रतिक्रिया
- लॉकडाऊनबाबत ‘या’ तारखेनंतर मुख्यमंत्री निर्णय घेऊ शकतात; राजेश टोपेंचा इशारा
- भांडुप ड्रीम्स मॉल आगीतील नुकसानग्रस्तांना शासनाने त्वरित भरपाई द्यावी – आठवले
- महाविकास आघाडीतील नेत्यांनीच मिठाचा खडा टाकू नये; अजितदादांनी राऊतांना झापलं
- ‘मन की बात’ कार्यक्रमात मोदींकडून खेळाडूंचं कौतुक
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

