Share

लॉकडाऊनबाबत ‘या’ तारखेनंतर मुख्यमंत्री निर्णय घेऊ शकतात; राजेश टोपेंचा इशारा

Published On: 

जालना : राज्यासह देशात कोरोनाचा धोका पुन्हा एकदा वाढत चालला आहे. कोरोनाचा रुग्णांचा वाढता आकडा लक्षात घेता चिंता व्यक्त केली जात आहे. सरकारकडून देखील राज्यातील काही भागामध्ये कडक निर्बंध लावण्यात आले आहे. तर, केंद्र सरकारतर्फे देखील महाराष्ट्रात दुसऱ्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे.

राज्यातील वाढत्या कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने नव्याने गाईडलाईन जारी केल्या आहेत. त्यानुसार आज रात्री ८ वाजल्यापासून ते पहाटे ७ वाजेपर्यंत जमावबंदी लागू करण्यात आली आहे. तसेच चौपाट्या, उद्याने, मॉल, सिनेमागृह यासाठीही सरकारने अनेक निर्बंध घातले असून सर्व प्रकारच्या कार्यक्रमांनाही बंदी घालण्यात आली आहे.

यासोबतच, राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन देखील करण्यात येत आहे. यामुळे संपूर्ण राज्यात पुन्हा लॉकडाऊन होणार का ? अशी भीती जनतेमध्ये निर्माण झाली आहे. सद्या तरी लॉकडाऊन करण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी स्पष्टता केली नसली तरी येत्या काही दिवसांमध्ये परिस्थिती गंभीर झाल्यास लॉकडाऊन करण्यात येईल असा इशारा राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिला आहे.

‘राज्यातील कोरोनाच्या परिस्थितीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नजर ठेवून आहेत. सर्व परिस्थितीचा ते 2 एप्रिल रोजी आढावा घेणार आहे. 2 तारखेनंतर लॉकडाऊनबाबत मुख्यमंत्री ठाकरे निर्णय घेतील, असं विधान राजेश टोपे यांनी केले आहे. मात्र, केंद्र सरकारच्या नव्या नियमावली नुसार संपूर्ण राज्य लॉकडाऊन करता येणार नाही असं जाहीर करण्यात आलं असल्याने राज्य सरकार काय पाऊल उचलणार हे येत्या काही दिवसातच समजेल.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!