नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २८ मार्च रोजी आपल्या ‘मन की बात’ या रेडिओ कार्यक्रमातून देशाला संबोधित केले. पंतप्रधान यावेळी नरेंद्र मोदींनी बऱ्याच विषयांवर भाष्य केलं. त्यामध्ये त्यांनी खेळाडूंचे देखील कौतुक केले आहे. पंतप्रधानांनी आजच्या मन की बातमध्ये विविध क्रीडा प्रकारात ठसा उमटवणाऱ्या खेळाडूंचं अभिनंदन केलं आहे.
पंतप्रधान मोदी म्हणाले की, “मार्च महिन्यात जेव्हा आपण महिला दिन साजरा करत होतो, तेव्हा अनेक महिला खेळाडूंनी पदकं आणि विक्रमांची आपल्या नावावर नोंद केली. दिल्लीत झालेल्या नेमबाजी स्पर्धेत भारत पहिल्या क्रमाकांवर राहिला. सुवर्ण पदकांमध्येही भारताने बाजी मारली. भारताच्या महिला आणि पुरुष नेमबाजांनी जबरदस्त कामगिरी केली.
याचदरम्यान पी.व्ही. सिंधूनेही सिल्व्हर मेडल जिंकलं. मिताली राज या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दहा हजार धावा करणाऱ्या पहिल्या भारतीय महिला क्रिकेटपटू बनल्या आहेत. त्यांचे ह्या यशाबद्दल खूप खूप अभिनंदन. एक दिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यांत 7000 धावा काढणाऱ्या त्या एकमेव आंतरराष्ट्रीय महिला खेळाडू आहेत, असं ते म्हणाले.” यानंतर मोदींनी अनेक विषयांवर चर्चा केली .
महत्वाच्या बातम्या
- धोनीच्या अनुपस्थितीमुळे कुलदीप-चहल ची जोडी फ्लॉप
- ‘वाईट गोष्टी म्हणजे अकर्मण्यता, खंडणी, टक्केवारी, सूडबुद्धी वगैरे का’?, भाजपचा मुख्यमंत्र्यांना सवाल
- पहाटे ५ वाजता केली चोरी; १० वाजता आरोपी जेरबंद
- म्यानमारमध्ये लष्कराडून नि:शस्त्र नागरिकांवर गोळीबार; अमेरिकेकडून निषेध !
- “अनिल देशमुख हे ‘अपघाताने’ गृहमंत्री तर उद्धव ठाकरे हे ‘विश्वासघाताने’ मुख्यमंत्री”
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

