Share

भांडुप ड्रीम्स मॉल आगीतील नुकसानग्रस्तांना शासनाने त्वरित भरपाई द्यावी – आठवले

Published On: 

मुंबई : भांडुप ड्रीम्स मॉल मधील सनराईझ रुग्णालय अग्निकांडात ड्रीम्स मॉल मधील सर्व दुकाने जळून खाक झाली आहेत. त्यात ‘दैनिक सम्राट’ या आंबेडकरी चळवळीच्या वृत्तपत्राच्या कार्यालयाचेही नुकसान झाले आहे. त्या सर्वांना नुकसानभरपाई त्वरित द्यावी या मागणीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्र पाठविले असल्याची माहिती रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिली आहे.

भांडुप पश्चिम च्या ड्रीम्स मॉल मध्ये सनराईझ हॉस्पिटल मध्ये आग लागून 12 जणांचा मृत्यू झाला. ड्रीम्स मॉल मधील दुकानांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. या मॉल मध्ये दैनिक सम्राट या आंबेडकरी चळवळीच्या आघाडी च्या दैनिकाच्या कार्यालयाचे ही मोठे नुकसान झाले आहे. त्या सर्व नुकसानग्रस्तांना राज्य सरकारने त्वरित नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी रामदास आठवले यांनी केली आहे.

ड्रीम्स मॉल मधील सन राईझ हॉस्पिटलमध्ये आगीतील मृतांच्या कुटुंबीयांना सांत्वनपर 10 लाख रुपयांचा निधी द्यावा अशी मागणी रामदास आठवले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कडे केली आहे. त्याबाबत चे पत्र ते लवकरच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देणार असल्याची माहिती रामदास आठवले यांनी दिली आहे.

महत्वाच्या बातम्या 

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!