Share

महाविकास आघाडीतील नेत्यांनीच मिठाचा खडा टाकू नये; अजितदादांनी राऊतांना झापलं

Published On: 

पुणे : गेल्या काही महिन्यांमध्ये महाविकास आघाडीतील सरकारमधील मंत्र्यांवर एकामागे एक आरोप होत आहेत. तर, सध्या गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्यावरून महाविकास आघाडीतील नेत्यांमध्येच मतभेद असल्याचं समोर येत आहे. तसेच, इतर काही मुद्द्यांवरून देखील वरिष्ठ नेते एकमेकांवर टीका करत असल्याचं दिसून येत आहे.

तर, गृहमंत्री अनिल देशमुख यांना गृहमंत्रीपद अपघाताने मिळाले आहे. जयंत पाटील, दिलीप वळसे-पाटील यांनी गृहमंत्रीपद स्वीकारण्यास नकार दिला. तेव्हा हे पद शरद पवार यांनी देशमुखांकडे दिले. या पदाची एक प्रतिष्ठा आणि रुबाब आहे. दहशतही आहे. आर. आर. पाटील यांच्या गृहमंत्री म्हणून कार्यपद्धतीची तुलना आजही केली जाते. संशयास्पद व्यक्तीच्या कोंडाळय़ात राहून गृहमंत्री पदावरील कोणत्याही व्यक्तीस काम करता येत नाही. पोलीस खाते आधीच बदनाम. त्यात अशा गोष्टींमुळे संशय वाढतो. असा टोला शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांनी आजच्या सामना रोखठोक मधून लगावला आहे.

या सर्व पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाष्य करत संजय राऊत यांना फटकारलं आहे. ‘राष्ट्रवादी काँग्रेसमधील कोणत्या नेत्यांवर काय जबाबदारी टाकायची याचे सर्वस्व निर्णय हे शरद पवार घेत असतात. इतरांनी याबाबत टीका केली तर गोष्ट वेगळी मात्र तिन्ही पक्षातील मान्यवर नेत्यांनी एकमेकांवरच भाष्य करत अडचणीत आणण्याचं प्रयत्न करू नये. महाविकास आघाडीचं एकत्रित काम सुरु असताना कोणीही त्यात मिठाचा खडा टाकू नये,’ अशा शब्दात त्यांनी अप्रत्यक्षरित्या संजय राऊत यांना सुनावलं आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!