Share

राजकारणात कोण कोणाचा शत्रू नसतो; शाह-पवारांच्या भेटीबाबत आव्हाडांची प्रतिक्रिया

Published On: 

मुंबई : आज राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. याचं कारण म्हणजे भाजपचे दिग्गज नेते व केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची गुजरातमध्ये भेट झाल्याचे वृत्त एका स्थानिक गुजराती दैनिकाने प्रसिद्ध केलं आहे.

यासोबतच, राष्ट्रवादीचे दिग्गज नेते आणि माजी केंद्रीय मंत्री प्रफुल पटेल यांनी भाजपच्या निकटवर्तीय बड्या उद्योगपतीची भेट घेतल्याची माहिती आहे. अहमदाबादच्या फार्महाऊसवर ही भेट झाली. या भेटीचे परिणाम महाराष्ट्राच्या राजकारणावर या भेटीचे परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विशेष म्हणजे पटेलांची संबंधित उद्योजकाशी भेट झाली, त्यावेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारही त्यावेळी अहमदाबादेतच होते. मात्र या बैठकीला पवार उपस्थित होते का, याची पुष्टी मिळालेली नाही.

दुसरीकडे, शरद पवार आणि प्रफुल पटेल यांची केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे दिग्गज नेते अमित शाह यांच्यासोबत गुप्त चर्चा झाल्याची माहिती एका गुजराती वृत्तपत्राने दिली आहे. शांतिग्राममधील गेस्टहाऊसला पटेल आणि पवार प्रायव्हेट जेटने आले होते, असा दावा या बातमीत करण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने हे वृत्त फेटाळून लावले असून राज्यातील विविध नेते यावर प्रतिक्रिया देत आहेत.

राष्ट्रवादीचे नेते व राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी देखील याबाबत भाष्य केलं आहे. ‘शरद पवार आणि अमित शहा यांची गुप्त भेट झाली तर तुमचे कोण गुप्तहेर होते हे माहीत नाही. पण 50 वर्षांच्या राजकीय जिवनात कुठल्याही पक्षाच्या नेत्यांनी जेवढे मित्र कमावले नाहीत तेवढे मित्र पवार साहेबांनी कमावले आहे. अनेक राज्यांचे प्रमुख नेते हे पवारांचे मित्र राहिले आहेत.’ असं आव्हाड म्हणाले.

यासोबतच, ‘आपल्या राज्यातील प्रमोद महाजन हे त्यांचे अत्यंत जवळचे होते. त्यामुळे संबंध आणि राजकारण याचा विचित्र प्रकार आता नवीन पिढीच्या राजकारणात आलाय. राजकारणात कोण कोणाचा शत्रू नसतो तो फक्त वैचारिक विरोधक असतो.’ अशी सूचक प्रतिक्रिया जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!