ऑस्ट्रेलिया : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या पहिल्या टेस्ट मॅचला आज (गुरूवार) पासून सुरूवात झाली आहे. पहिल्या दिवस-रात्र कसोटी सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. ऍडलेडच्या मैदानात होणारी ही टेस्ट मॅच डे-नाईट असल्यामुळे गुलाबी बॉलने खेळवण्यात येणार आहे.
दरम्यान नाणेफेक जिंकल्यामुळे भारतीय संघ पहिला कसोटी सामना जिंकण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याचं कारण म्हणजे कर्णधार विराट कोहलीने आतापर्यंत जेव्हा जेव्हा कसोटी सामन्यांमध्ये नाणेफेक जिंकली आहे. त्यावेळी भारताने २१ वेळा सामने जिंकले असून ४ सामने अनिर्णित राहिले आहेत. विराटने नाणेफेक जिंकल्यानंतर भारताने आतापर्यंत एकही सामना गमावलेला नाही.
ओपनिंगला पृथ्वी शॉ का शुभमन गिल तसंच विकेट कीपर म्हणून ऋद्धीमान साहा का ऋषभ पंत यांना संधी मिळणार? असा प्रश्न विचारला जात होता. पण विराट कोहलीने पृथ्वी शॉ आणि ऋद्धीमान साहा यांना संधी दिली आहे. फास्ट बॉलिंगची जबाबदारी जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी आणि उमेश यादव यांच्यावर असेल, तर अश्विन हा एकमेव स्पिनर खेळणार आहे. शुभमन गिल हा 12वा खेळाडू असेल.
महत्वाच्या बातम्या
- चंद्रकांत पाटलांची होम पिचवर परीक्षा! तर ‘बंटी’ विरुद्ध ‘मुन्ना’ सामना रंगणार
- येळकोट, येळकोट…जय मल्हार : खंडेरायाच्या जेजुरीगडाला आकर्षक रोषणाई!, पहा फोटो
- केंद्राने राज्य सरकारला जमीन देण्याचे आदेश दिले! मग प्रकल्प का थांबवला? काँग्रेस नेत्याचा गौप्यस्फोट
- हायकोर्टाकडून जनभावनेची अवहेलना- संजय निरुपम
- भावी अधिकाऱ्यांच्या व्यथा: आई बापाचं स्वप्न पूर्ण करायला सरकार कधी देणार मौका?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

