🕒 1 min read
कोल्हापूर : २०१९ विधानसभांच्या निकालानंतर शिवसेनेने भाजपसोबत असलेला संसार मोडून विसंगत विचारधारा असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससोबत महाविकास आघाडीचं सरकार स्थापन केलं. यानंतर, हे तीनचाकी सरकार एकमेकांच्या पायात पाय अडकून पडेल असं भाकीत करून भाजप नेत्यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली.
मात्र, आता या महाविकास आघाडी सरकारला वर्षपूर्ती झाली आहे. वर्षपूर्ती झाली असतानाच महाविकास आघाडी सरकारने शिक्षक व पदवीधर आमदारकीची परीक्षा पास केली असून भाजपचा दारुण पराभव झाला आहे. शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस हे तीन पक्ष एकत्र लढल्यामुळे त्यांना मोठा फायदा झाल्याचं या निवडणुकांमुळे दिसल्यामुळे आता येणाऱ्या स्थानिक निवडणुकांमध्ये स्वबळावर दिलेला नारा सोडून हे तीन पक्ष एकत्र लढण्याची शक्यता बळावली आहे.
त्यामुळे भाजपची डोकेदुखी वाढणार असून भाजप प्रदेशाध्यक्ष व आमदार चंद्रकांत पाटील यांना होम पिचवर तंगड्या आव्हानाला समोर जावं लागणार आहे. कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीचं बिगुल वाजलं असून या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. कोल्हापूर महापालिका निवडणुकीची मुदत ऑक्टोबर महिन्यातच संपली आहे. येत्या 21 डिसेंबर रोजी कोल्हापूर महापालिका निवडणुकीसाठी आरक्षणाची सोडत निघणार असून शहरातल्या 81 प्रभागांमध्ये अटीतटीची लढत रंगणार आहे.
या निवडणुकांमध्ये चंद्रकांत पाटील यांच्या प्रतिष्ठेसोबतच राज्याचे गृहराज्यमंत्री बंटी उर्फ सतेज पाटील आणि माजी खासदार मुन्ना उर्फ धनंजय महाडिक यांच्यात खरा सामना रंगणार आहे. महाडिक हे राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपात आले आहेत. मात्र, काँग्रेस-राष्ट्रवादी राज्यात मित्र पक्ष असून देखील कोल्हापूर मध्ये काँग्रेसचा गट (सतेज पाटील) विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसचा गट (धनंजय महाडिक ) यांच्यात कट्टर राजकीय वैर असल्याने त्याचा फायदा शिवसेनेला झालेला लोकसभा निवडणुकांमध्ये दिसून आलं होतं. त्यामुळे आता या दोन नेत्यांमध्ये पुन्हा एकदा सामना रंगणार असल्याने कोणाचा जोर लागणार याकडं लक्ष लागलं आहे. तर, भाजपला पश्चिम महाराष्ट्रात लागलेली उतरती कळा संपून भाजप उसळी मारणार कि आपटणार? हे देखील राज्य पातळीवरच्या पुढील समीकरणांसाठी महत्वाचं असणार आहे.
महत्वाच्या बातम्या
- समता परिषदेने मानले सरकारचे आभार; ओबीसी कार्यकर्त्यांना मोर्चे, आंदोलने थांबवण्याचं आवाहन
- येळकोट, येळकोट…जय मल्हार : खंडेरायाच्या जेजुरीगडाला आकर्षक रोषणाई!, पहा फोटो
- केंद्राने राज्य सरकारला जमीन देण्याचे आदेश दिले! मग प्रकल्प का थांबवला? काँग्रेस नेत्याचा गौप्यस्फोट
- हायकोर्टाकडून जनभावनेची अवहेलना- संजय निरुपम
- भावी अधिकाऱ्यांच्या व्यथा: आई बापाचं स्वप्न पूर्ण करायला सरकार कधी देणार मौका?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
