Share

हायकोर्टाकडून जनभावनेची अवहेलना- संजय निरुपम

Published On: 

मुंबई:- आरेतील मेट्रो कारशेड कांजूरमार्गला हलवण्यावरून ठाकरे सरकार आणि भाजपमध्ये वाद पेटलेला आहे. आता मुंबई उच्च न्यायालयाने ठाकरे सरकारला जोरदार धक्का दिला आहे. कांजूरमार्गमधील मेट्रो कारशेडचे काम थांबवण्याचे आदेशच न्यायालयाने दिले आहे. मुंबई मेट्रो-3च्या कांजूरमार्गमधल्या कारशेडच्या कामावर मुंबई उच्च न्यायालयानं स्थगिती आणली आहे. सध्या परिस्थिती जैसे थे ठेवण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत.

न्यायालयानं दिलेल्या आदेशानंतर आता भाजपाकडून ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली जात आहे. भाजपा नेत्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या महाविकास आघाडी सरकारवर टीका करण्यास सुरुवात केली आहे. परंतु हायकोर्टाकडून जनभावनेची अवहेलना झाली असे मत संजय निरुपम यांनी व्यक्त केले आहे.

मुंबईतील आरे कॉलनीमध्ये मेट्रोची कारशेड बनवण्यात येऊ नये अशी सामान्य नागरिकांची भावना होती. मेट्रो कारशेडसाठी कांजूरमार्गपेक्षा चांगला पर्याय दुसरा कोणताही नाही. पण कांजूर येथील प्रस्तावित मेट्रो कारशेडच्या कामांना स्थगिती देऊन उच्च न्यायालयाने जनभावनेची अवहेलना केली आहे. योजना तयार करणे आणि त्यांची अमलबजावणी करणे हे न्यायालयाचे नव्हे, तर सरकारचे काम आहे, असे ट्विट करत काँग्रेसचे नेते संजय निरूपम यांनी न्यायलयाच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!