Share

केंद्राने राज्य सरकारला जमीन देण्याचे आदेश दिले! मग प्रकल्प का थांबवला? काँग्रेस नेत्याचा गौप्यस्फोट

Published On: 

मुंबई : आरेतील मेट्रो कारशेड कांजूरमार्गला हलवण्यावरून ठाकरे सरकार आणि भाजपमध्ये वाद पेटलेला आहे. आता मुंबई उच्च न्यायालयाने ठाकरे सरकारला जोरदार धक्का दिला आहे. कांजूरमार्गमधील मेट्रो कारशेडचे काम थांबवण्याचे आदेशच न्यायालयाने दिले आहे. यामुळे भाजप नेत्यांनी महाविकास आघाडीला चांगलंच लक्ष्य केलं आहे.

मुंबई मेट्रो-3च्या कांजूरमार्गमधल्या कारशेडच्या कामावर मुंबई उच्च न्यायालयानं स्थगिती आणली आहे. सध्या परिस्थिती जैसे थे ठेवण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. एमएमआरडीएला देखील तातडीनं काम थांबवण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. कांजूरमार्गची जागा मेट्रो कारशेडसाठी देण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे.

यावरून आज दिवसभर राजकारण रंगलेलं असतानाच काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी मात्र काही कागदपत्र समोर आणत केंद्राने ती जमीन राज्य सरकारला देण्याचे आदेश दिल्याचा दावा केला आहे. ‘पियुष गोयल यांच्या निर्देशाने केंद्रीय वाणिज्य विभागाने जुलैमध्ये नमक विभागाला कांजूरमार्ग जागा राज्याला देण्यात यावी असे आदेश दिले असताना प्रकल्प थांबवा ही मागणी न्यायालयात केली ती राज्यातील भाजपा नेत्यांच्या सांगण्यावरून! भाजपा महाराष्ट्राच्या विकासाच्या झारीतील कमळाचार्य आहे’ अशी जळजळीत टीका त्यांनी भाजपवर केली आहे.

तर, ‘कांजूरमार्ग येथील जागेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सर्वांसाठी घरे या नीतीतून १ लाख परवडणारी घरे तयार करण्यासाठी फडणवीस सरकार धोरण तयार करत होते. जर कांजूरमार्ग येथील जागेवर मोदींच्या इच्छेखातर परवडणारी घरे होऊ शकत होती तर मेट्रो कारशेड का नाही?’ असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला असून सचिन सावंत यांच्या या दाव्यावर भाजप नेते काय प्रत्युत्तर देणार? जनतेच्या कामांना स्थगितीमध्ये लटकावून त्याचा खर्च किती दिवस वाढवणार असे प्रश्न देखील निर्माण होत आहेत.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!