जेजुरी : यंदा सण-उत्सव साजरे करण्यावर कोरोनाच्या गंभीर परिस्थितीमुळे निर्बंध आले आहेत. गणेशोत्सव, ईद, दसरा, यासोबतच सर्व धर्मिय सणांवर कोरोनाचे सावट असल्याने सर्व सण साधेपणाने व खबरदारीने साजरे करावेत असे आवाहन प्रशासनाने केले होते. प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करत नागरिकांनी देखील साधेपणाने हे सण साजरे केले जात आहेत.
गावागावाच्या जत्रा, सण, उत्सव यावर्षी अत्यंत साधेपणाने साजरे केले जात असून शासनाने जाहीर केलेल्या नियमावलीचं देखील पालन केलं जात आहे. खंडेरायाच्या जेजुरीगडावर सोमवती अमावस्येला यात्रा भरत असते. या यात्रेला प्रचंड गर्दी होत असते, त्यामुळे या कालावधीमध्ये मंदिरावर संचारबंदी करण्यात आली होती. यानंतर खंडोबाच्या चंपाषष्टी उत्सवाला प्रारंभ होतो. आता, मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी खुले करण्यात आले असून भाविकांनी नियम पाळून दर्शनास यावं असं आवाहन मंदिर समितीने केलं आहे.
दरम्यान, या उत्सवानिमित्त मंदिराला आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. जेजुरी गड हा रोषणाईने उजळून निघाला असून अत्यंत नयनरम्य असे दृश्य ड्रोनद्वारे टिपण्यात आले आहेत. पहा रात्रीच्या वेळी विद्युत रोषणाईमुळे लखाखलेल्या जेजुरी गडाचे छायाचित्रे-



महत्वाच्या बातम्या
- समता परिषदेने मानले सरकारचे आभार; ओबीसी कार्यकर्त्यांना मोर्चे, आंदोलने थांबवण्याचं आवाहन
- शेतकरी आंदोलनाच्या आडून वोडाफोन-आयडिया आणि एअरटेलचा खोटा प्रचार; जिओचा गंभीर आरोप
- ‘या सरकारला अजून अक्कल येत नाही आणि येईल अशी खात्री सुद्धा नाही’
- हायकोर्टाकडून जनभावनेची अवहेलना- संजय निरुपम
- भावी अधिकाऱ्यांच्या व्यथा: आई बापाचं स्वप्न पूर्ण करायला सरकार कधी देणार मौका?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

