🕒 1 min read
नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने आता सलामीवीर रोहित शर्मा (Rohit Sharma) कडे एकदिवशीय आणि टी २० चे कर्णधारपद सोपवले आहे. टी-20 विश्वचषकानंतर रोहित शर्माकडे टी-20 संघाचे कर्णधारपद दिल्यानंतर आता त्याला वनडे संघाचे कर्णधारपदही देण्यात आले आहे.
दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर तो एकदिवसीय सामन्यात संघाचा कर्णधार असेल. कर्णधार झाल्यानंतर रोहितने बीसीसीआय (BCCI) टीव्हीला मुलाखत दिली आहे. बीसीसीआयने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून रोहितचा हा व्हिदिओ शेअर केला आहे. या मुलाखतीत रोहितने विराटचे कौतुक केले आहे. तसेच त्याचा सोबतचा प्रवास कसा होता याबबत सांगितले आहे.
नवा मर्यादित षटकांचा कर्णधार रोहित शर्मा म्हणाला की, विराट कोहलीने पाच वर्षे आघाडीचे नेतृत्व केले आणि स्टार फलंदाजाच्या हाताखाली खेळलेल्या प्रत्येक क्षणाचा त्याने पुरेपूर आनंद घेतला.’
दक्षिण आफ्रिका दौऱ्यापूर्वी भारतीय कसोटी संघाच्या सराव सत्रादरम्यान रोहित म्हणाला, ‘विरटाने पाच वर्षे संघाचे नेतृत्व केले प्रत्येक सामना जिंकण्याच्या इराद्याने आम्ही बाहेर पडायचो आणि हाच संदेश संपूर्ण संघाला दिला जात असे. ‘आम्ही त्याच्या नेतृत्वाखाली खेळण्याचा आनंद लुटला. मी त्याच्या नेतृत्वाखाली भरपूर क्रिकेट खेळलो आणि प्रत्येक क्षणाचा आनंद लुटला. मी ते पुढे नेत राहीन.’
आपल्या कार्धार पदाबाबत बोलताना रोहित म्हणाला, ‘मला जेव्हा जेव्हा भारतीय संघाचे कर्णधारपदाची संधी मिळाली तेव्हा मी खेळाडूंशी स्पष्टपणे संवाद साधण्याचा प्रयत्न केला आहे. प्रशिक्षक आणि कर्णधारासाठीही ते महत्त्वाचे असते. मी खेळाडूंना संघात का निवडले गेले आणि त्यांची भूमिका काय आहे हे समजावून सांगण्याचा प्रयत्न करेन.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘सर्व विरोधकांना एकत्र आणण्याचे काम फक्त शरद पवारच करु शकतात’
- सीबीआय, ईडी, इनकम टॅक्स माझ्यापर्यंत पोहोचू शकले नाही- संजय राऊत
- शरद पवार पक्ष स्थापनेपासून पंतप्रधान पदाची स्वप्न बघत आहेत- देवेंद्र फडणवीस
- सचिन सावंत यांनी ट्विट करत भाजपाला सांगितला राऊतांनी उच्चारलेल्या ‘त्या’ शब्दाचा अर्थ
- भाजप कार्यकर्त्यांविषयी केलेल्या ‘त्या’ वक्तव्यावरून; राऊतांविरोधात दिल्लीत तक्रार दाखल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
