🕒 1 min read
मुंबई : आयपीएल २०२२ (IPL 2022) मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा माजी कर्णधार विराट कोहली यंदा खराब फॉर्ममधून जात आहे. सध्याचा हंगाम हा त्याच्या आयपीएल कारकिर्दीतील आतापर्यंतचा सर्वात वाईट हंगाम म्हणता येईल. या मोसमात विराट धावांसाठी झगडताना दिसत आहे आणि त्यामुळेच त्याचा स्ट्राइक रेटही खूपच कमी आहे आणि तो तीनदा शून्यावर (गोल्डन डक) बाद झाला आहे. यादरम्यान, तो सनरायझर्स हैदराबादविरुद्ध दोनदा बाद झाला. आपल्या फॉर्मबाबत आता विराटनेच मत दिले आहे.
आरसीबी इनसाइडरमध्ये दानिश सैतशी झालेल्या मजेदार संभाषणात, पहिल्या चेंडूवर बाद झाल्यानंतर तो का हसत होता हे विराटने स्पष्ट केले. तो म्हणाला, ”दुसऱ्या डकनंतर मला असहाय्य होणे कसे असते हे कळले. माझ्या कारकिर्दीत असे कधीच घडले नाही. म्हणूनच मी हसत होतो. कारण खूप वेळ झाला आहे आणि मला या परिस्थितीने जे काही दाखवायचे आहे ते पाहिले आहे.”
विराट कोहली त्याच्या खराब फॉर्मवर टीका करणाऱ्यांविषयी म्हणाला, ”ते माझी जागा घेऊ शकत नाहीत. मला जे वाटते ते त्यांना जाणवू शकत नाही. ते माझे आयुष्य जगू शकत नाहीत. ते क्षण जगू शकत नाहीत. तुम्ही आवाजाचा सामना कसा करता? तुम्ही एकतर टीव्ही बंद करा किंवा लोक काय म्हणत आहेत त्याकडे दुर्लक्ष करा. मी त्या दोन्ही गोष्टी करतो.”
महत्त्वाच्या बातम्या –
IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

