Share

IPL 2022 LSG vs GT : लाइव्ह मॅचमध्ये डोक्याला हात लावून बसला हार्दिक पंड्या..! नक्की झालं काय? वाचा

Published On: 

🕒 1 min read

पुणे : हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखालील गुजरात टायटन्स हा आयपीएल २०२२ (IPL 2022)च्या प्लेऑफमध्ये पोहोचणारा पहिला संघ ठरला आहे. आयपीएलच्या ५७व्या सामन्यात गुजरातने लखनऊ सुपर जायंट्सचा (LSG vs GT) ६२ धावांनी पराभव करत प्लेऑफचे तिकीट पटकावले. कमी धावसंख्येच्या या सामन्यात गुजरातच्या गोलंदाजांनी उत्कृष्ट गोलंदाजीचे उदाहरण सादर केले. हार्दिक या सामन्यात विशेष काही करू शकला नाही आणि ११ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. पंड्या आऊट झाला तेव्हा त्याला विश्वासच बसला नाही.

हार्दिकने लखनऊचा यष्टीरक्षक क्विंटन डी कॉकच्या हातात झेल दिला. आऊट झाल्यानंतर तो कपाळाला हात लावून बसला, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. लखनऊचा कर्णधार केएल राहुलने डावाच्या १०व्या षटकात आवेश खानला चेंडू दिला आणि त्याने पहिल्याच चेंडूवर हार्दिकला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. हार्दिकने ऑफ साइडमधून बाहेरील चेंडूवर जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न केला. पण तो अयशस्वी ठरला. यानंतर हार्दिक जेव्हा पॅव्हेलियनमध्ये परतला तेव्हा तो काही वेळ हेल्मेट घालून बसला होता. त्याला पश्चाताप होत होता.

https://twitter.com/krishnaa_ti/status/1524042843366764546

असा रंगला सामना…

हार्दिक पंड्याच्या नेतृत्वात पदार्पणाचा आयपीएल हंगाम खेळणाऱ्या गुजरात टायटन्सने धमाका केला. आयपीएल २०२२ (IPL 2022) मधील स्पर्धेच्या ५७व्या सामन्यात (LSG vs GT) लखनऊ सुपर जायंट्सचा सुपडा साफ करत गुजरात प्लेऑफसाठी पात्र होणारा पहिला संघ ठरला आहे. स्पर्धेत सलग होणाऱ्या सामन्यांमुळे संथ होत चाललेल्या खेळपट्टीचा अंदाज घेत हार्दिकने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. शुबमन गिलच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर गुजरातने लखनऊला १४५ धावांचे आव्हान दिले. प्रत्युत्तरात राशिद खानचे ४ बळी आणि त्याला इतर गोलंदाजांनी दिलेल्या साथीमुळे गुजरातने लखनऊचा डाव फक्त ८२ धावांवर संपुष्टात आणला आणि ६२ धावांनी विजय नावावर केला. या विजयासह गुजरात १८ गुणांसह गुणतालिकेत पहिल्या स्थानावर विराजमान झाला.

महत्त्वाच्या बातम्या –

IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!