🕒 1 min read
मुंबई : आयपीएल २०२२ (IPL 2022) मध्ये चेन्नई सुपर किंग्जकडून खेळणारा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा स्पर्धेतून बाहेर होण्याची शक्यता असल्याचे वृत्त टाइम्स ऑफ इंडियाने दिले आहे. दुखापतीमुळे जडेजा आता उर्वरित सामने खेळू शकणार नाही. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुविरुद्धच्या सामन्यादरम्यान क्षेत्ररक्षण करताना जडेजाला ही दुखापत झाली होती. त्यानंतर तो दिल्ली कॅपिटल्सविरुद्धचा सामनाही खेळला नव्हता.या सामन्यात चेन्नईने दिमाखदार विजय नोंदवला.
या हंगामाच्या सुरुवातीला रवींद्र जडेजा चेन्नई संघाचा कर्णधार होता. त्याच्या नेतृत्वाखाली संघाची सुरुवात चांगली झाली नाही. चेन्नईला पहिल्या चार सामन्यात पराभव पत्करावा लागला. यानंतर बंगळुरूविरुद्ध त्याने विजयाचे खाते उघडले, पण संघाला सलग विजय मिळवता आला नाही. त्यामुळे रवींद्र जडेजाने ३०मेच्या संध्याकाळी महेंद्रसिंह धोनीकडे पुन्हा कर्णधारपद सोपवले. फलंदाजी आणि गोलंदाजीतही जडेजाने निराशा केली.
#IPL2022 #CSK #ChennaiSuperKings #jadeja #RavindraJadeja may be ruled out due to injury ????@imjadeja suffered an injury in the upper body while fielding in @ChennaiIPL loss against @RCBTweets
Details ➡️ https://t.co/cZdjkRbrzb pic.twitter.com/31liKmHIfe
— TOI Sports (@toisports) May 11, 2022
दिल्लीविरुद्धच्या सामन्यात कर्णधार महेंद्रसिंह धोनीनेही रवींद्र जडेजाला प्लेइंग इलेव्हनमधून वगळण्याचे कारण दिले होते. जडेजा तंदुरुस्त नाही आणि त्यामुळेच तो खेळत नसल्याचे धोनीचे म्हणणे होते. धोनीने तेव्हा जडेजा तंदुरुस्त का नाही किंवा काय समस्या आहे याबाबत कोणतीही माहिती दिली नव्हती.
जडेजासाठी यंदा आयपीएलच्या १० सामन्यांमध्ये ११६ धावा केल्या आहेत आणि ५ विकेट्स घेतल्या आहेत. यावर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणार्या टी-२० विश्वचषकात भारतासाठी जडेजाव उपलब्ध असावा, असे सर्वांचे मत आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

