🕒 1 min read
मुंबई : मशिदीवरील भोंग्यांसंदर्भात मनसेने आक्रमकपणे घेतलेली भूमिका, हनुमान चालीसा आंदोलन यामुळे राज्यातलं राजकीय वातावरण चांगलेच तापलेले आहे. या आंदोलनामुळे पोलिसांनी राज्यभरात अनेक मनसे कार्यकर्त्यांची धरपकड केली आहे. आता मात्र एक वेगळी खळबळ उडवून देणारी बातमी समोर येत आहे. एकीकडे हे सगळं गोंधळ सुरु असताना आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांना जीवे मारण्याची धमकी आली आहे. जीवे मारण्याचा धमकीचं पत्र मिळालं आहे, असे बाळा नांदगावकर यांनी सांगितली आहे.
आज सकाळी नांदगावकर यांनी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची भेट घेतली. भेटीनंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. गृहमंत्र्यांनी या प्रकरणात लक्ष घातलं आहे आणि पोलीस आयुक्तांना या प्रकरणाची माहिती कळवलं आहे, नांदगावकर यांनी सांगितलले. कालच नांदगावकर यांनी मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे यांचीही भेट घेतली होती. धमकीच्या पत्राची प्रत ही त्यांना दिली, असे नांदगावकर म्हणाले. मला आणि राज ठाकरेंना जीवे मारण्याची धमकी आली आहे. या पत्राची प्रत मी काल पोलीस आयुक्त संजय पांडे यांना दिली आहे. गृहमंत्र्यांशीही आमची चर्चा झाली आहे. हे पत्र कोणाकडून आलंय याबद्दल काही माहिती नाही. नांदगावकरला धमकी आली तर ठीक आहे पण राज ठाकरेंच्या केसाला धक्का लागला तर राज्य पेटल्याशिवाय राहणार नाही, याची दखल राज्य आणि केंद्र सरकरानेही घ्यावी, असेही नांदगावकर म्हणाले.
धमकीच्या या पत्रातील मजकूर हिंदीतून लिहिलेलं आहे. काही शब्द उर्दू भाषेतून ही लिहलेल्या आहेत, असे बाळा नांदगावकर यांनी म्हटलं आहे. या प्रकरणी गृहमंत्र्यांशी बोललो आहे. वळसे पाटील हे चांगले गृहमंत्री आहे, ते यावर नक्कीच कारवाई करतील, असंही नांदगावकर म्हणाले आहे. राज्य तसंच केंद्र सरकारने हे प्रकरण गांभीर्याने घ्यायला पाहिजे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

