Share

IPL 2022 LSG vs GT : …अन् ड्रेसिंग रूममध्ये लखनऊच्या खेळाडूंवर भडकला गौतम गंभीर! पाहा VIDEO

Published On: 

🕒 1 min read

पुणे : आयपीएल २०२२ (IPL 2022) मध्ये गुजरात टायटन्सने पुन्हा एकदा लखनऊ सुपर जायंट्सला (LSG vs GT) हरवत प्लेऑफमध्ये स्थान मिळवले. लखनऊला गुजरातविरुद्ध मानहानीकारक पराभव पत्करावा लागला. त्यामुळे लखनऊचा मेंटॉर गौतम गंभीरही खेळाडूंवर रागावला. त्याने या पराभवानंतर ड्रेसिंग रूममधील सर्व खेळाडूंना धारेवर धरले.

सामना संपल्यानंतर गंभीर म्हणाला, “हरण्यात काहीच गैर नाही. एक संघ जिंकतो आणि एक संघ हरतो, पण हार मानणे चुकीचे आहे. मला असे वाटले, की आज आपण आधीच हार मानली आहे. आम्ही कमकुवत दिसत होतो. खरे सांगायचे तर. आयपीएल सारख्या स्पर्धेत कमकुवत दिसण्यास वाव नाही. समस्या इथेच आहे. आम्ही या स्पर्धेत संघांना पराभूत केले आणि खूप चांगले क्रिकेट खेळले पण आज आपल्यात गेम सेन्स दिसला नाही.”

https://www.instagram.com/p/CdZKhChsmS8/

असा रंगला सामना…

हार्दिक पंड्याच्या नेतृत्वात पदार्पणाचा आयपीएल हंगाम खेळणाऱ्या गुजरात टायटन्सने धमाका केला. आयपीएल २०२२ (IPL 2022) मधील स्पर्धेच्या ५७व्या सामन्यात (LSG vs GT) लखनऊ सुपर जायंट्सचा सुपडा साफ करत गुजरात प्लेऑफसाठी पात्र होणारा पहिला संघ ठरला आहे. स्पर्धेत सलग होणाऱ्या सामन्यांमुळे संथ होत चाललेल्या खेळपट्टीचा अंदाज घेत हार्दिकने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. शुबमन गिलच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर गुजरातने लखनऊला १४५ धावांचे आव्हान दिले. प्रत्युत्तरात राशिद खानचे ४ बळी आणि त्याला इतर गोलंदाजांनी दिलेल्या साथीमुळे गुजरातने लखनऊचा डाव फक्त ८२ धावांवर संपुष्टात आणला आणि ६२ धावांनी विजय नावावर केला. या विजयासह गुजरात १८ गुणांसह गुणतालिकेत पहिल्या स्थानावर विराजमान झाला.

महत्त्वाच्या बातम्या –

IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!