नवी दिल्ली : दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज खेळाडू एबी डिव्हिलियर्सने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. सोशल मीडियावर पोस्ट करून त्याने ही माहिती दिली. एबी डिव्हिलियर्सने निवृत्ती घेतल्याचे जाहीर करताच सोशल मीडियावर क्रिकेटर्स आणि चाहत्यांच्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत.
एबी डिव्हिलियर्सने घेतलेल्या या निर्णयानंतर त्याचे चाहते निराश तसेच भावनिक देखील झाले आहेत. तर दुसरीकडे त्याच्या यशस्वी क्रिकेट कारकिर्दीबद्दल आनंदी देखील आहेत. आणि भविष्यासाठी त्याला शुभेच्छा देत आहेत. विराट कोहली आणि डिव्हिलियर्सचे बाँडिंग कोणापासून लपलेले नाही, दोघेही खूप चांगले मित्र आहेत हे सर्वांनाच माहित आहे. डिव्हिलियर्सच्या निवृत्तीवर कोहलीनेही पोस्ट करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
आरसीबीकडून खेळण्यापूर्वी एबी डिव्हिलियर्स दिल्ली कॅपिटल्सचा एक भाग होता. मात्र, आरसीबीमध्ये सामील झाल्यानंतर तो या संघाचा भाग झाला. फ्रँचायझी ही आपल्या कुटुंबासारखी आहे, असा त्याचा स्वतःचा विश्वास होता. एबी डिव्हिलियर्सने आयपीएलमध्ये एकूण 184 सामने खेळले, ज्यामध्ये त्याने 5162 धावा केल्या.
कोहलीने ट्विट करून लिहिले, ‘आमच्या काळातील सर्वोत्कृष्ट खेळाडू आणि तू आतापर्यंत मला भेटलेला सर्वात प्रेरणादायी खेळाडू आहेस. आपले नाते सहकारी खेळाडूंपेक्षा खूप जास्त आहे आणि नेहमीच असेल. कोहलीने पुढे लिहिले, या निर्णयाने माझे मन दुखावले आहे, परंतु मला माहित आहे की तू स्वतःला आणि तुमच्या कुटुंबाला लक्षात ठेवून हा निर्णय घेतला आहे. कोहलीसह बऱ्याच क्रिकेटपटूंना ट्विट करत पुढील आयुष्यासाठी त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. पाहूया क्रिकेटपटूंचे ट्विट.
To the best player of our times and the most inspirational person I've met, you can be very proud of what you've done and what you've given to RCB my brother. Our bond is beyond the game and will always be.
— Virat Kohli (@imVkohli) November 19, 2021
Looked up to in my early cricket days and it’s been an honour to play against you ???? Good luck @ABdeVilliers17 and thank you for everything you’ve done for cricket ???? https://t.co/iLqqdqy6ax
— Shreyas Iyer (@ShreyasIyer15) November 19, 2021
Thanks @ABdeVilliers17, enjoy retirement! ????❤️#BringtheHEAT pic.twitter.com/TquNtUOEBL
— Brisbane Heat (@HeatBBL) November 19, 2021
Cricket has been exceptionally kind to me. Whether playing for the Titans, or the Proteas, or RCB, or around the world, the game has given me unimagined experiences and opportunities, and I will always be grateful.
— AB de Villiers (@ABdeVilliers17) November 19, 2021
महत्वाच्या बातम्या:
- धडाकेबाज फलंदाज एबी डिविलियर्सने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून केली निवृत्तीची घोषणा
- शेतकाऱ्यांसामोर या आधीही घ्यावी लागली होती पंतप्रधान नरेंद्र मोदींना माघार
- ‘हे’ दुःखद, लज्जास्पद, पूर्णपणे अन्यायकारक; केंद्र सराकराच्या निर्णयावर कंगना नाराज
- ‘शेतकरी आंदोलनात ६०० पेक्षा अधिक शेतकऱ्यांचा जीव गेला, याला जबाबदार कोण?’
- ‘त्या गोष्टीवर काम करायला हवे’; गौतम गंभीरने सांगितली सूर्यकुमारची मोठी कमजोरी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

