Share

धडाकेबाज फलंदाज एबी डिविलियर्सने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून केली निवृत्तीची घोषणा

Published On: 

नवी दिल्ली : दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार आणि दिग्गज एबी डिव्हिलियर्सने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृतीची घोषणा केली आहे. एबी डिव्हिलियर्सने काही काळापूर्वी इंटरनॅशनल क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. पण, आता त्याने क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती घेतली असल्याचे जाहीर केले आहे.

दरम्यान, आता एबी डिव्हिलियर्स आयपीएलमध्येही खेताना दिसणार नाही. डिव्हिलियर्स रॉयल चॅलेंजर बंगळुरू संघाकडून खेळत होता. आता डिव्हिलियर्स इथून पुढे या संघाचा भाग नसणार आहे.

एबी डिव्हिलियर्सने ट्विट करून याबाबतची माहिती दिली आहे. ट्विट करत डिव्हिलियर्स म्हणाला, ‘ हा अविश्वसनीय प्रवास होता. परंतु, मी सर्व क्रिकेटच्या प्रकारातून निवृत्ती घेतोय. मी माझ्या बॅकयार्डमध्ये माझ्या मोठ्या भावांसोबत क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली होती. तेव्हापासूनच मी पूर्ण आनंद आणि उत्साहासह हा खेळ खेळलो आहे. आता 37 वर्षांच्या वयात मी त्याच फॉर्मात तेवढ्याच वेगानं खेळू शकत नाही.’ यासोबतच एबी डिव्हिलियर्सने सर्वांनचे आभार देखील मानले आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!