Share

विराट कोहलीने केले यंग ब्रिगेडला मार्गदर्शन

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : भारतीय क्रिकेट संघाने ऑस्ट्रेलिया संघाचा उपांत्य फेरीत तब्बल ९० धावांनी खुर्दा पाडून दिमाखात १९ वर्षाखालील क्रिकेट विश्वकरंडकाच्या अंतिम सामन्यात दिमाखात प्रवेश केला. हा भारतीय क्रिकेट संघाचा सलग चौथा अंडर-१९ विश्वकरंडक अंतिम सामना असणार आहे. विराट कोहलीच्याच नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट संघाने २००८ मध्ये दक्षिण आफ्रिका संघाचा १२ धावांनी पराभव करून १९ वर्षाखालील विश्वकरंडक पटकावला होता. आता त्याच विराट कोहलीने यावर्षीच्या अंडर -१९ विश्वकरंडकाच्या अंतिम सामन्यात पोहचलेल्या भारतीय क्रिकेट संघाला मोलाचा सल्ला दिला आहे.

त्याने आज भारतीय अंडर-१९ क्रिकेट  संघाशी व्हीडिओ कॉल द्वारे संपर्क साधून मन मोकळ्या गप्पा मारल्या आहेत. कर्णधार यश धूलच्या शतकी तडाख्याच्या जोरावर भारताने ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच भूमीत पराभूत केलं आणि दिमाखात अंतिम सामन्यात प्रवेश केला. आता भारतीय संघाचा अंतिम सामना इंग्लंडशी होणार आहे. हा संघ या अत्यंत महत्वाच्या सामन्याची तयारी तर करतच आहे, मात्र त्यांना आता भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली कडून मोलाचे मार्गदर्शन मिळत आहे.

आज विराट कोहलीने विडिओ कॉल करून यंग ब्रिगेडशी संवाद साधला आहे. भारताला दमदार विजय मिळवून देणारा कर्णधार यश धूल, राज्यवर्धन हर्गेगेकर आणि कौशल तांबे या तिघांशी विराटने झूम कॉलवरून गप्पा मारल्या आहेत आणि संघातील सर्वच खेळाडूंना मार्गदर्शन सुद्धा केले आहे. विराट कोहलीच्या मार्गदर्शनानंतर विराट भैय्या, तुम्ही केलेल्या मार्गदर्शनामुळे क्रिकेटमधील आणि आयुष्यातील काही महत्त्वाच्या गोष्टी शिकलो. तुमच्या मार्गदर्शनाचा आम्हाला भविष्यात खेळ सुधारण्यासाठी नक्कीच फायदा होईल”, अशी  राज्यवर्धनने प्रतिक्रिया दिली आहे.

विराट कोहलीने यंग ब्रिगेडशी संवाद साधताना मन लावून खेळा कुठल्याच गोष्टीचा दबाव मनावर आणू नका तसेच अंतिम सामन्यातील एकूण एक क्षण आनंदाने अनुभवा असा मोलाचा सल्ला दिला आहे. आत्तापर्यंत भारताने सर्वात जास्त ४ वेळा १९ वर्षांखालील विश्वकरंडक उंचावला आहे. विराट कोहलीच्या आधी भारताचा स्टार फलंदाज रोहित शर्माने सुद्धा भारताच्या यंग ब्रिगेडला मार्गदर्शन केले आहे. भारताचा हा अंतिम सामना उद्या दिनांक ५ फेब्रुवारी रोजी होणार आहे.

      महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!