Share

“ह्याचे डोकं फिरले आहे…”, चंद्रशेखर राव यांच्या ‘त्या’ वक्तव्यावर जितेंद्र आव्हाडांचा संताप

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : तेलंगणाचे मुख्यमंत्री आणि तेलंगणा राष्ट्र समिती पक्षाचे प्रमुख के. चंद्रशेखर राव यांनी “पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दूरदर्शी नेते नाहीत. भाजपाला केंद्रातून हटवून बंगालच्या खाडीत फेकून द्यायला हवं. आम्ही शांत बसणार नाहीत, देशाचं नेतृत्व बदलायला हवं, भारताचे संविधान पुन्हा लिहिण्याची गरज आहे.” असे वक्तव्य केले होते. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी संताप व्यक्त केला आहे. ह्याचे डोक फिरले आहे, अशी प्रतिक्रिया जितेंद्र आव्हाडांनी दिली आहे.

https://twitter.com/Awhadspeaks/status/1489449339629961217

चंद्रशेखर राव (केसीआर) पंतप्रधान मोदी आणि भारतीय संविधानावर बोलताना म्हणाले होते, “पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दूरदर्शी नेते नाहीत. भाजपाला केंद्रातून हटवून बंगालच्या खाडीत फेकून द्यायला हवं. आम्ही शांत बसणार नाहीत, देशाचं नेतृत्व बदलायला हवं. देशाला असमजूतदार नेते आणि पक्षापासून मुक्त करायला हवं. भाजपाकडून सोशल मीडियाचा गैरवापर होत आहे. समाजात फूट पाडण्याचं आणि खोटा प्रचार, खोटा प्रसार करण्याचं कामही भाजपाकडून होत असल्याचे केसीआर यांनी म्हटलं आहे.

चंद्रशेखर राव यांनी मोदी सरकारच्या २०२२ च्या अर्थसंकल्पावरही टीका केली. हे बजेट बेकार आणि उद्देशहीन आहे, असेही राव म्हणाले. दरम्यान, केसीआर यांनी केंद्रातील मोदी सरकारविरुद्ध घेतलेली भूमिका आणि उद्धव ठाकरेंना भेटण्याची व्यक्त केलेली इच्छा पाहता, भाजपाचे अच्छे दिन धोक्यात असल्याचं दिसून येत आहे. आपण, लवकरच उद्धव ठाकरेंना भेटायला मुंबईला जाणार असल्याचेही राव यांनी सांगितलं

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!