Share

आदित्य ठाकरेंच्या वक्तव्यावर भातखळकरांचे टीकास्त्र; म्हणाले,‘मुख्यमंत्री मुंबईचे आहेत म्हणण्यापेक्षा…’

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : मुंबई महापालिका (Mumbai Municipal Corporation) निवडणूक (Election)जवळ आली असताना काल(३ फेब्रु.)पालिकेचा अर्थसंकल्प (Budget) सादर करण्यात आला. गेल्या वर्षी ३९ हजार कोटींचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला होता. दरम्यान, यावर्षीचा अर्थसंकल्प हा आत्तापर्यंतच्या पालिकेच्या इतिहासातला सर्वात मोठा अर्थसंकल्प असून या पार्श्वभूमीवर बोलत असतांना पर्यावरण मंत्री आणि मुंबई उपनगरचे पालकमंत्री आदित्य ठाकरे(Aditya Thackeray) यांनी पहिल्यांदाच मुख्यमंत्री मुंबईचे असल्याने मुंबईसाठी ज्या काही चांगल्या गोष्टी झालेल्या आहेत, ते या अर्थसंकल्पातून दिसत आहे, असे वक्तव्य केले आहे. दरम्यान, आदित्य ठाकरेंच्या या वक्तव्यावर आता भाजप नेते अतुल भातखळकर(Atul Bhatkhalkar) यांनी केली आहे.

यासंदर्भात अतुल भातखळकर यांनी ट्विट केले असून ट्विटमध्ये ते म्हणाले आहेत की,‘मनोहर जोशी बहुदा कराचीचे होते. तसेच मुख्यमंत्री मुंबईचे आहेत म्हणण्यापेक्षा वांद्र्यातील मातोश्री २ चे आहेत म्हणणं जास्त शोभून दिसेल,’ असा खोचक टोला भातखळकरांनी लगावला आहे.

दरम्यान, यंदाचे महानगरपालिकेचे बजेट हे एका अत्यंत संवेदनशील, प्रगतीशील राज्याच्या राजधानीचे आहे. यात महिलांसाठी, पर्यावरणासाठी खूप महत्त्वाच्या गोष्टींची तरतूद आहे. एकंदरच मुंबईच्या प्रगतीसाठी या बजेटमध्ये तरतुदी केलेल्या आहेत. पहिल्यांदाच मुख्यमंत्री मुंबईचे असल्याने मुंबईसाठी ज्या काही चांगल्या गोष्टी झालेल्या आहेत, ते या अर्थसंकल्पातून दिसत आहे’, असे आदित्य ठाकरे म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!